Video : कमाल! पायलट बनायचं होतं म्हणून टाटा नॅनोचं बनवलं हेलिकॉप्टर

Video : कमाल! पायलट बनायचं होतं म्हणून टाटा नॅनोचं बनवलं हेलिकॉप्टर

बिहारमधल्या छापरामध्ये राहणाऱ्या मिथिलेशला हे कुतूहल होतंच. शिवाय त्याची पायलट बनण्याची इच्छा होती. त्याचं हे स्वप्न तो पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हिंमत कायम ठेवली आणि असं काही करून दाखवलं की ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

  • Share this:

छपरा (बिहार), 10 ऑगस्ट : हेलिकॉप्टर आणि विमानाबदद्ल अनेकांना प्रचंड कुतुहल असतं. बिहारमधल्या छापरामध्ये राहणाऱ्या मिथिलेशला हे कुतूहल होतंच. शिवाय त्याची पायलट बनण्याची इच्छा होती. त्याचं हे स्वप्न तो पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हिंमत कायम ठेवली आणि असं काही करून दाखवलं की ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

मिथिलेशने टाटा नॅनो गाडीला हेलिकॉप्टरचं रूप दिलं आहे. या गाडीमध्ये त्याने हेलिकॉप्टरसारखेच बदल केले आहेत. कारच्या छताला त्याने हेलिकॉप्टरसारखा पंखाही लावला आहे.

एवढंच नाही तर कारच्या आतल्या भागालाही त्याने हेलिकॉप्टरचा लूक दिला आहे. नॅनोचं हेलिकॉप्टर झाल्यानंतर त्याने ते रंगवलंही अगदी हेलिकॉप्टरच्या थाटात.

मिथिलेशसारखंच स्वप्न पाहणारे आणखीही काही लोक जगात आहेत. चीनमध्येही एका शेतकऱ्याचं विमान उडवण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न तोही पूर्ण करू शकला नाही पण त्याने Airbus A320 ची प्रतिकृती बनवली.

वडिलांच्या मृतदेहासमोरच लावलं लग्न, खुर्चीत बसवून फोटोही काढले!

बिहारच्या मिथिलेशचं हे टाटा नॅनो हेलिकॉप्टर बघण्यासाठी परिसरातल्या सगळ्यांची एकच झुंबड उडालेली असते. कुणी त्याचे व्हिडिओ काढत असतं तर कुणी त्यात बसून बघत असतं.

नॅनो ही सामान्य माणसांची कार समजली जाते. तसंच नॅनोचं रूपांतर करून तयार केलेलं हेलिकॉप्टर हे सामान्यांचं हेलिकॉप्टर आहे.

=======================================================================================================

VIDEO : मृत्यूनंतरही सुटका नाही.., अखेर आजींचा मृतदेह बोटीतून आणला

Published by: Arti Kulkarni
First published: August 10, 2019, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading