मुंबई, 5 नोव्हेंबर: आयफोन हा बहुतेकांना आवडतो. परंतु अॅपल आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येकजण तो खरेदी करू शकत नाही. अनेकजण आयफोन खरेदी करण्यासाठी सेल किंवा डिस्काउंटची वाट पाहतात, आणि जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण आयफोन 14 च्या खरेदीवर तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळतोय.
अॅपल कंपनीनं आयफोन 14 सीरिज सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च केली, आणि काही दिवसात हा फोन विक्रीसाठीही उपलब्ध करून दिला. पण या फोनची विक्री कंपनीच्या अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. कारण त्यात आणि आयफोन 13 मध्ये फारसा फरक नाही. उलट आयफोन 13 ची किंमत कमी झाली आहे. मात्र, तुम्हाला जर फक्त आयफोन 14 घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की, हा फोन आतापर्यंतच्या सर्वोत्तम डिस्काउंटमध्ये तुम्हाला कुठे खरेदी करता येईल. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर नाही तर जिओ मार्टच्या ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी केल्यावर तुम्हाला या फोनच्या किंमतीवर मोठा डिस्काउंट मिळेल.
काय आहेत आयफोन 14 मध्ये फीचर्स?
आयफोन 14 च्या 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन A15 बायोनिक चिपवर काम करतो. 5G सेवेसह हा आयफोन 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह येतो. फोनच्या मागील बाजुला असणाऱ्या कॅमेरा सेटअपमध्ये दिलेले दोन्ही सेन्सर 12 मेगापिक्सलचे आहेत, तर फ्रंट कॅमेरादेखील 12 मेगापिक्सलचा आहे. ड्युअल सिम कार्ड या फोनमध्ये तुम्हाला वापरता येईल. या फोनला एक वर्षाची ब्रँड वॉरंटीदेखील दिली जाईल.
हेही वाचा: आयफोनचं बॅटरी लाइफ चांगलं ठेवायचंय? फॉलो करा या महत्वाच्या टिप्स...
जिओ मार्टमध्ये मिळेल मोठा डिस्काउंट
आयफोन 14 च्या बेस मॉडेल आणि बेसिक 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 79,900 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन जिओ मार्ट ऑफलाइन स्टोअरमधून घेतला तर तुम्हाला तो खूप स्वस्त मिळेल. हा फोन जिओ मार्टमध्ये दोन हजार रुपये डिस्काउंट देऊन विकला जात असून तेथे त्याची किंमत 77,900 रुपये आहे. तसेच हा फोन खरेदी करताना वेगवेगळ्या बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डवर देखील वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. काही बँकांच्या कार्डवर तर तुम्हाला 5 हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत तुमच्यासाठी 72,900 रुपये होईल.
तुमचं आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असेल, तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कारण आयफोन 14 वर डिस्काउंट मिळत आहे. आयफोन चाहत्यांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone