मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /iPhone 13 वर आतापर्यंतच सर्वांत मोठं Discount, स्मार्टफोन्सही मिळताहेत स्वस्तात; लवकरच घ्या ऑफरचा लाभ

iPhone 13 वर आतापर्यंतच सर्वांत मोठं Discount, स्मार्टफोन्सही मिळताहेत स्वस्तात; लवकरच घ्या ऑफरचा लाभ

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने विविध डिस्काउंट ऑफर्स ( discount offers) लाँच करत असतात. सेल आयोजित करून खरेदीवर मोठी सूट देत असतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने विविध डिस्काउंट ऑफर्स ( discount offers) लाँच करत असतात. सेल आयोजित करून खरेदीवर मोठी सूट देत असतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने विविध डिस्काउंट ऑफर्स ( discount offers) लाँच करत असतात. सेल आयोजित करून खरेदीवर मोठी सूट देत असतात.

 नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: ई-कॉमर्समधल्या ( e-commerce) वाढत्या स्पर्धेने खरेदीदारांसमोर ( consumers) कंपन्यांमार्फत अनोखे पर्याय ठेवले जात आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने विविध डिस्काउंट ऑफर्स ( discount offers) लाँच करत असतात. सेल आयोजित करून खरेदीवर मोठी सूट देत असतात. कंपन्यांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या या सेलची ग्राहकदेखील वाट पाहत असतात. अमेरिकेत ( United States) सध्या 'ब्लॅक फ्रायडे सेल’ (Black Friday Sale) सुरू असून या योजनेअंतर्गत इतर वेळी महाग असणारे स्मार्टफोन ( smartphone) खूपच स्वस्तात घेण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. त्यात सर्वांत महाग स्मार्टफोन खूप स्वस्तात मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी लाँच झालेले फोनही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. यूएसमधल्या अनेक कंपन्या स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स आणि टीडब्ल्यूएस (TWS) इअरबड्स यांसारख्या अ‍ॅक्सेसरीजसह इतर प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट देत आहेत. तुम्ही अमेरिकेत असाल आणि स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर ही योग्य संधी आहे. कारण ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन 13 (Apple iPhone 13) आणि गुगल पिक्सेल 6 (Google Pixel 6) यांसारखे स्मार्टफोन अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत.

हेही वाचा-  Smartphone वर भारतीय रोज घालवतात इतका वेळ! App डाउनलोड करण्यााचा टक्काही वाढला

 स्मार्टवॉचच्या खरेदीवर ऑफर शोधणाऱ्या ग्राहकांना Apple Watch 7, Apple Watch 6 आणि Apple Watch SE यासह Verizon.com वर अ‍ॅपल वॉचच्या विस्तृत श्रेणीवर 100 डॉलर्स म्हणजे जवळपास 7 हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल.  Verizon.com वर Apple iPad, iPad Pro, iPad mini आणि iPad Air च्या खरेदीवर 350 डॉलर्स म्हणजे जवळपास 26 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या यादीमध्ये iPad 9th जनरेशन, iPad Air 4th जनरेशन आणि iPad Pro यांचादेखील समावेश आहे.

Verizon Wireless वर अ‍ॅपल आयफोनच्या खरेदीवर 500 डॉलर्स म्हणजे जवळपास 37 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांची बचत होणार आहे. ही ऑफर iPhone 13, iPhone 12, iPhone 11, iPhone 11 Pro Max, iPhone XR, iPhone X आणि iPhone 8 साठी उपलब्ध आहे.

Verizon.com वर Google Pixel 5, Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 700 डॉलर्स म्हणजेच जवळपास 52 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या ऑफर्स पिक्सेल स्मार्टफोन्सच्या क्लाउडी व्हाइट, स्टॉर्मी ब्लॅक, सॉर्टा सनी आणि जस्ट ब्लॅक कलर व्हॅरिएंटवर उपलब्ध आहेत.

हेही वाचा-  Vivo कंपनीचा हा धमाकेदार Smartphone झाला लॉन्च; पाहा फीचर्स, Price, Specifications

 ब्लॅक फ्रायडे सेलअंतर्गत स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर प्रॉडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही अमेरिकेत असाल, तर या सेलमध्ये खरेदी करण्याची संधी साधणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

First published:

Tags: Apple, Smartwatch