कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी, ऍपल, मायक्रोसॉफ्टकडून धोक्याचा इशारा

कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी, ऍपल, मायक्रोसॉफ्टकडून धोक्याचा इशारा

सिक्योरिटी एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, सायबर अटॅकमध्ये जगभरातील काही सर्वात मोठ्या अडल्ट वेबसाईट्सला निशाणा करण्यात आलं आहे. या वेबसाईट्सवर अटॅक करुन हॅकर्स यात धोकादायक मालवेयरची एन्ट्री करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सला मोठा धोका असल्याचं बोललं जात आहे. एका रिपोर्टनुसार, पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या युजर्सच्या डेटाला सर्वाधित धोका असल्याचं समोर आलं आहे. सिक्योरिटी एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर अटॅकमध्ये जगभरातील काही सर्वात मोठ्या अडल्ट वेबसाईट्सला निशाणा करण्यात आलं आहे. या वेबसाईट्सवर अटॅक करुन हॅकर्स यात धोकादायक मालवेयरची एन्ट्री करत आहेत. या धोक्याची गंभीरता पाहता, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टने यूजर्सला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

या सायबर अटॅकमागे Malsmoke नावाच्या एका हॅकर ग्रुपचा हात असल्याची माहिती मिळत आहे. हा ग्रुप अडल्ड वेबसाईट्सला टार्गेट करुन त्यात ऍडवेयर आणि मालवेयर पोहचवत असल्याचं एक्सपर्ट्सना आढळलं आहे. इंफेक्टेड वेबसाईट्सवर जाणाऱ्या यूजर्सला व्हायरस असणाऱ्या पेजवर रिडायरेक्ट करुन त्यांच्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर मालवेयर टाकला जात असल्याची माहिती आहे.

आता दुसऱ्याचं WhatsApp स्टेटस डाऊनलोड करता येणार

Malwarebytes च्या सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सनुसार, Malsmoke आतापर्यंत केवळ छोट्या अडल्ट आणि पॉर्न वेबसाईट्सला निशाणा करत होते. परंतु आता अडल्ट वेबसाईट xHamster वर मालवेयर अटॅक करण्यात आला असून एक्सपर्ट्सनुसार हा अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. xHamster चे जगभरात अनेक युजर्स असून, या युजर्सच्या डेटाला Malsmoke ग्रुपचा मोठा धोका असल्याचं मानलं जात आहे.

microsoft आणि apple चा अलर्ट

एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर ग्रुप या सायबर अटॅकसाठी Adobe Flash Player आणि Internet Explorer चा वापर करतात. सध्या ज्या युजर्सच्या विंडोज किंवा macOS मशीनमध्ये हे दोन सॉफ्टवेयर नाहीत, त्यांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे. microsoft आणि apple ने Adobe Flash Player च्या वापराशी संबंधित या धोक्याबद्दल युजर्सला अलर्ट केलं असून सावधनतेचा इशारा दिला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 2, 2020, 1:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या