मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Bajaj Pulsar आणि Platina वर भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर्स

Bajaj Pulsar आणि Platina वर भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर्स

आता पुन्हा एकदा गाडी ऑफर्समध्ये गाडी खरेदी करण्याची संधी आहे. जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. 2020 मध्ये कोरोनाच्या संकटात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून आता विविध ऑफर्सच्या मदतीने हा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : सणासुदीच्या काळात विविध कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणल्या होत्या. अनेक ऑफर्स, डिस्काउंट्स असल्याने, फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी करतात. आता पुन्हा एकदा गाडी ऑफर्समध्ये गाडी खरेदी करण्याची संधी आहे. जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. 2020 मध्ये कोरोनाच्या (covid19) संकटात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून आता विविध ऑफर्सच्या मदतीने हा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यविविध ऑफर्सच्या मदतीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बजाजने देखील आपल्या प्लॅटिना (Platina ) आणि पल्सर (Bajaj Pulsar) या दोन गाड्यांवर ऑफर्स दिल्या आहेत.

Bajaj Pulsar 125 -

बजाजने आपल्या नवीन पल्सर 125 (Bajaj Pulsar 125) या मॉडेलवर भरघोस सूट दिली आहे. कंपनीने चार पल्सर मॉडेलपैकी 125 या मॉडेलवर कॅश डिस्काउंट (cash discount ) दिला आहे. पल्सर 125 चे चार मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध असून यात, Single seat drum, split seat drum, single seat disc आणि slit seat disc या मॉडेलचा समावेश आहे.

(वाचा - बाईकवरून प्रवास करण्याच्या नियमात बदल; आता हे नियम पाळावेच लागणार)

परंतु यात केवळ drum brake आणि Disc Brake वेरिएंटवर डिस्काउंट मिळणार आहे. यात 2 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार असून, केवळ 12,725 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता.

प्लॅटिनावरही ऑफर -

बजाजच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या Bajaj Platina या गाडीवर मोठी सूट आहे. या गाडीच्या Platina 100 आणि Platina 110 H-Gear या दोन्ही वेरिएंटवर कॅश डिस्काउंट मिळतो आहे. यात बजाज Platina 100 वर 2800 रुपये तर Platina 110 H-Gear वर 2500 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. या गाडीवर 5 वर्षाची गॅरंटीही मिळणार आहे.

(वाचा - सेकेंड हँड बाईक खरेदी करायची? इथे मिळतील बेस्ट ऑफर्स)

सध्या या गाडीची किंमत देखील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे. Platina 100 ची किंमत 58,605 रुपये, तर Platina 110 H-Gear या किंमत 63,027 रुपये आहे.

First published: