गेमिंग वेबसाइटपासून सावधान! एका क्लिकमुळे होऊ शकते मोठी फसवणूक

गेमिंग वेबसाइटपासून सावधान! एका क्लिकमुळे होऊ शकते मोठी फसवणूक

फोननंतर आता गेमिंग वेबसाइटचा वापर करून नागरिकांची कशी फसवणूक केली जात आहे जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट: देशात लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून हॅकर्स नागरिकांच्या बँक अकाऊंटमधून हजारोंची लूट करत आहेत. आधी एखाद्या अॅपच्या माध्यमातून नंतर 92 या फोननंबरचा वापर करून तर आता गेमिंग वेबसाइटचा आधार घेऊन हॅकर्स बँक खात्यापर्यंत पोहोचत आहेत.

जर गेमिंग वेबसाईटची आवड असेल आणि तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. कारण एक चूक हॅकर्सच्या फायद्याची आणि तुम्हाला महागात पडणारी असू शकते. ऑनलाइन गेमिंग वेबसाईटद्वारे हैदराबाद पोलिसांनी लोकांकडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग टेलिग्राम ग्रुप्समार्फत हा प्रकार होत आहे.

हे वाचा-'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजित दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO

याशिवाय टेलिग्रामच्या ग्रूपवर नवीन सदस्य जोडण्यासाठी कमिशनही दिलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रूपवर रेफरन्सच्या आधारे एन्ट्री मिळते. त्यानंतर ग्राहकाची माहिती मिळवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

टेलिग्रामच्या ग्रूपवर खेळांविषयी लिंक दिल्या जातात. ही गेमिंग वेबसाइट रोज बदलणारी असते. त्यामुळे हॅकर्सपर्यंत पोहोचणंही कठीण होऊन जातं. त्यानंतर एखाद्या विशिष्ट रंगाचा वापर करून डाव खेळण्यास सांगितलं जातं. यात खेळाडूंना रंग ओळखण्याचा अंदाज देखिल लावण्यास सांगितला जातो.

तुम्ही जर टेलिग्राम वापरत असाल आणि तिथून एखाद्या खेळाची लिंक डाऊनलोड करत असाल तर सावधान. अशा प्रकारे एखाद्या लिंकच्या मदतीनं तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 14, 2020, 3:15 PM IST

ताज्या बातम्या