मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /छोटीशी चूक पडू शकते महागात, Online Transaction वेळी बाळगा सावधगिरी

छोटीशी चूक पडू शकते महागात, Online Transaction वेळी बाळगा सावधगिरी

ट्रान्झेक्शनपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक ट्रेंडमध्ये बदल झाले. याचदरम्यान ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

ट्रान्झेक्शनपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक ट्रेंडमध्ये बदल झाले. याचदरम्यान ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

ट्रान्झेक्शनपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक ट्रेंडमध्ये बदल झाले. याचदरम्यान ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : कोरोना काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ट्रान्झेक्शनपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक ट्रेंडमध्ये बदल झाले. याचदरम्यान ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स विविध मार्गांनी लोकांच्या बँक अकाउंटमध्ये चोरी करत आहेत. यापासून वाचण्यासाठी सावधगिरीपूर्वक काही गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात.

- तुमचा फोन, लॅपटॉप किंवा इतर डिव्हाईस सुरक्षित ठेवण्यासाठी बग्स, मालवेअरपासून वाचण्यासाठी लेटेस्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाकणं फायद्याचं ठरतं. त्याशिवाय डिव्हाईसचा पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे. अँटीव्हायरस चांगल्या कंपनीचा टाकणं महत्त्वाचं आहे.

ऑनलाईन खरेदी करताय? या 5 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा आर्थिक फसवणुकीचा धोका

फिशिंग स्कॅम -

कोणत्याही अ‍ॅप किंवा ईमेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. एखाद्या अनोळख्या लिंकवर क्लिक करणं नुकसानकारक ठरू शकतं. त्याशिवाय कोणत्याही लिंकवरुन अ‍ॅप इन्स्टॉल करू नये. यामुळे हॅकर्सला तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो.

पर्सनल डिटेल्स -

युजर्सने आपले पर्सनल डिटेल्स जन्मतारिख, अकाउंट नंबर, एटीएम, पीन नंबर, ओटीपी इत्यादी गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. कॅशबॅक, ऑफर, रिवॉर्ड्सच्या जाळ्यात न पडता अशा लिंकवर क्लिक करू नका, तसंच फॉर्वर्डही करू नका.

Cyber Fraud झाल्यास 24 तासांत असे मिळतील संपूर्ण पैसे, करावं लागेल हे एक काम

ऑनलाईन शॉपिंग -

कोणत्याही अनोळखी वेबसाईटवरुन शॉपिंग करू नका. ऑनलाईन वेबसाईटवरुन वस्तू मागवताना किंवा नवं अ‍ॅप डाउनलोड करताना त्या अ‍ॅपची लिंक, लोगो, रिव्ह्यू पाहणं गरजेचं आहे. ऑनलाईन शॉपिंगच्यावेळी फेक, बनावट वेबसाईटच्या नादात अडकण्याची शक्यता आहे. यामुळे बँक अकाउंट खाली होण्याचा धोका असतो.

First published:
top videos

    Tags: Online fraud, Online shopping