मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! Sim card संदर्भात फोन आला असेल तर आधी हे वाचा; पुण्याच्या CA तरुणीला हातोहात फसवलं

सावधान! Sim card संदर्भात फोन आला असेल तर आधी हे वाचा; पुण्याच्या CA तरुणीला हातोहात फसवलं

तुमचं सिम कार्ड 4G करावं लागेल, असं सांगणारा मोबाईल कंपनीच्या माणसाचा फोन आला आणि सव्वादोन लाख रुपयांचा चुना लागला. सिम कार्ड क्लोन करून ही फसवणूक झाली आहे.

तुमचं सिम कार्ड 4G करावं लागेल, असं सांगणारा मोबाईल कंपनीच्या माणसाचा फोन आला आणि सव्वादोन लाख रुपयांचा चुना लागला. सिम कार्ड क्लोन करून ही फसवणूक झाली आहे.

तुमचं सिम कार्ड 4G करावं लागेल, असं सांगणारा मोबाईल कंपनीच्या माणसाचा फोन आला आणि सव्वादोन लाख रुपयांचा चुना लागला. सिम कार्ड क्लोन करून ही फसवणूक झाली आहे.

पुणे, 14 सप्टेंबर : फसव्या लिंक पाठवून त्याद्वारे तुमचं अकाउंट हॅक करून पैशावर डल्ला मारायचा हे उद्योग आत्तापर्यंतच्या सायबर गुन्ह्यांमधून उघड झाले आहेत. पण आता सायबर गुन्हेगार sim card चा वापर करून लुबाडू लागले आहेत. अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली असून एका चार्टर्ड अकौंटंटला सव्वा दोन लाख  रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

जगभरात सायबर हल्लेखोर विविध मार्गांनी नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत असतात. मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवे फोन करून बँकेची माहिती विचारण्याच्या बहाण्याने अनेकदा नागरिकांची फसवणूक केली जाते. पुण्यात उच्चशिक्षित तरुणीला असंच हातोहात फसवण्यात आलं.  या चार्टर्ड अकौंटंट महिलेला 'सिम कार्ड कंपनीमधून बोलत असल्याचं सांगत ही फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्या या टोळीने त्यांना फोन करून त्या वापरत असलेल्या मोबाईल ऑपरेटर कंपनीतून बोलत असल्याचं सांगितलं. 'तुमचं सिम कार्ड हे 3G असून तात्काळ तुम्हाला हे 4G करून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचं सिम कार्ड ब्लॉक होईल', अशी भीती दाखवण्यात आली.

फोन केल्यानंतर त्यांनी या व्यक्तीला आपण खरंच मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचं पटवून दिलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फोन नंबरवर एक 20 आकडी कोड पाठवला आणि त्यावर क्लिक करायला सांगितलं. त्यांनी हे केल्यानंतर त्यांचं सिमकार्ड तात्काळ बंद झालं. त्याचवेळी या भामट्यानी त्यांचं सिमकार्ड एका दुसऱ्या कार्डवर क्लोन करून बँकेतून पैसे काढण्यासाठी त्याचा उपयोग केला.

वाचा - लाखो डिव्‍हाइसेसवर मोठा धोका! तुमचा सगळा डेटा bluetooth मधून हॅकरपर्यंत पोहोचतो

बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याचा तात्काळ मेसेज त्या तरुणीला आला. आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपलं बँक खातं ब्लॉक केलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये यासंदर्भात FIR दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सिम स्वपिंगच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही फोन आल्यास आपल्या बँक खात्यासंबंधी कोणतीही माहिती शेअर न करण्याचे आदेश तसंच कुठल्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अनेक लोक याला फसत असून नकळतपणे फसवणूक होत आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अशा प्रकारचे फोन आल्यास तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन यासंदर्भात काम करून घेऊ शकता आणि स्वतःची फसवणूक टाळू शकता.

First published:
top videos