Whatsapp आणि Instagram वापरताना तरुणीला एक चूक पडली महागात; क्षणात 46 हजार झाले गायब

Whatsapp आणि Instagram वापरताना तरुणीला एक चूक पडली महागात; क्षणात 46 हजार झाले गायब

Instagram आणि whatsapp वापरणाऱ्या एका तरुण मुलीचं अकाउंट हॅक करून काही ऑनलाइन ठगांनी तिची माहिती चोरली आणि 46000 रुपडे तिच्या बँकेतून गायब झाले. नेमकी काय चूक केली तिने?

  • Share this:

जयपूर, 25 नोव्हेंबर : डिजिटल जगात आपली खासगी माहिती जपणं किती गरजेचं आहे, हे एका घटनेवरून उघड होईल. Instagram आणि whatsapp वापरणाऱ्या एका तरुण मुलीचं अकाउंट हॅक करून काही ऑनलाइन ठगांनी तिची माहिती चोरली. त्याचा वापर करून तिच्या बँक अकाउंटमधून 46000 रुपये गायब केले. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.

जयपूरला राहणाऱ्या रिया शर्मा नावाच्या मुलीच्या बाबतीत ही फसवणूक घडली आहे. इन्स्टाग्रामवर एका सर्व्हेमध्ये ती सहभागी झाली होती. त्यामध्ये तिने तिच्याबद्दलची माहिती भरली होती. त्यात तिचा फोन नंबरसुद्धा तिने लिहिला होता. हा फोन नंबर नंतर कुठल्याशा whatsapp ग्रूपवर आपोआप अॅड करण्यात आला. या ग्रूपमध्ये आपण अॅड झालो हे तिला कळलंही नाही. पण या ग्रूपमध्ये कुठे कुठला डिस्काउंट सुरू आहे, ऑनलाइन सेल आदींची माहिती दिली जात होती.

अशीच एक बॅगची जाहिरात पाहून रियाने ती खरेदी करण्याची ऑनलाईन ऑर्डर दिली. त्यासाठी ग्रूप अॅडमिनने तिला PhonePay डाउनलोड करण्यास सांगितलं. त्यासाठी अॅडमिनने तिच्या फोनवर एक लिंकसुद्धा पाठवली.

संबंधित - Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

या लिंकवर क्लिक केल्यावर रियाच्या लक्षात आलं की तिच्या अकाउंटमधून 46000 रुपये काढले गेले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

काय काळजी घ्यावी?

मॉल, पेट्रोल पंप इथे मिळणाऱ्या कूपन्समध्ये असणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका.

माहिती नसलेल्या कुठल्याही फोन पेमेंट सिस्टीमने पैसे भरण्यास नकार द्या.

नेहमी वापरत असणाऱ्या ऑनलाइन पेमेंट सिस्टीमचाच वापर करा.

Instagram वर आलेल्या सर्व्हेमध्ये सामील होण्यापूर्वी तुमची माहिती सुरक्षित राहील याची खात्री करून घ्या.

कुठलंही नवं अॅप डाऊनलोड करण्याआधी विचार करा. डेव्हलपर कोण आहे याची खात्री करूनच क्लिक करा.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 25, 2019, 7:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading