Home /News /technology /

मोबाइल फोनला सायबर अटॅकचा धोका, Fraud पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच

मोबाइल फोनला सायबर अटॅकचा धोका, Fraud पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच

मोबाइल फोनच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत.

  नवी दिल्ली, 7 मे : मोबाइल फोन आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्मार्टफोन आता केवळ फोन करण्यासाठीचं माध्यम राहिलं नसून अनेक गोष्टी त्यावर केल्या जातात. खाजगी ते सार्वजनिक, आर्थिक अशा अनेक गोष्टी मोबाइल फोनमध्ये असतात. फोन काही वेळ काम करत नसेल तर लोकांना बेचैन झाल्यासारखंही होतं. अनेकजण दैनंदिन जीवनातील गरजांसाठी मोबाइलवरच अवलंबून असतात. भारतात कोरोना लॉकडाउननंतर मोबाइल फोनच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. बँकिंगशी संबंधित कामं किंवा शॉपिंग, तिकीट बुक करणं, फिरायला जाण्यासाठी अशा अनेक गोष्टींची तयारी फोनवरच केली जाते. मोबाइल फोनच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत. मोबाइल फोन आणि ईमेलवर अशा फेक लिंक्स येतात ज्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सची संपूर्ण माहिती हॅकर्सकडे पोहोचते. तसंच एखादं App इन्स्टॉल करतानाही डेटा चोरी होते. सायबर सुरक्षा आणि अँटी व्हायरस कंपनी कॅस्परस्काय लॅबने (Kaspersky) मागील वर्षी मोबाइल डिव्हाइसवर झालेल्या 35 लाखांहून अधिक सायबर हल्ल्यांची माहिती मिळवली होती. मोबाइल सुरक्षा देणारी प्रायव्हेट कंपनी जिमपेरियमने (Zimperium) सांगितलं, की आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 पैकी एका मोबाइल फोनवर मालवेअयरचा अटॅक झाला आहे. येणाऱ्या काळात 10 पैकी 4 मोबाइल फोनवर सायबर अटॅकचा धोका आहे. कोट्यवधी मोबाइल फोन हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. राहा अलर्ट - हॅकर्सच्या हल्ल्यापासून तुम्ही तुमचा फोन वाचवू शकता. यासाठी अलर्ट राहण्याची गरज आहे. मोबाइन डेटाच्या वापरात अचानक वाढ होणं, स्क्रिनवर पॉप-अप दिसणं, फोनची बॅटरी लवकरण संपणं, अनोळखी App दिसणं अशा गोष्टी दिसल्यास अलर्ट व्हा. हॅकर्सच्या हातात तुमच्या फोनचं ऑपरेटिंग सिस्टम आलं असल्याचं हे ठरू शकतं.

  हे वाचा - सावधान! Browser वर वेबसाइटचं नाव टाइप करताना घ्या काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान

  या गोष्टी लक्षात ठेवा - सार्वजनिक ठिकाणीच्या वायफायचा वापर करू नका. तसंच फ्री वायफाय वापरत असाल, तर त्यावेळी फायनेंशियल ट्रान्झेक्शन करू नका. ऑनलाइन पेमेंट, बँकिंगसंबंधी गोष्टी करू नका. ऑनलाइन शॉपिंग करताना अधिकृत वेबसाइटचा वापर करा. नव्या वेबसाइटचा वापर करताना यूआरएलवर लक्ष द्या. https पासून यूआरएल सुरू होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड्स ठेवा. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी अनेक जण सर्व अकाउंटसाठी सारखेच पासवर्ड ठेवतात. ते धोक्याचं ठरू शकतं. पासवर्ड स्ट्राँग असणं तसंच तो वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे. नेहमी विश्वासार्ह अँटी व्हायरस App चा वापर करा आणि फोन स्टोरेज सतत क्रिन करत राहा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या