Home /News /technology /

आता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV! हे आहे 5 उत्तम पर्याय

आता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV! हे आहे 5 उत्तम पर्याय

TV

TV

Xiaomi, OnePlus, Motorola यांसारख्या कंपन्या स्वस्तात टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. अशाच काही टीव्हींवर आपण आज नजर टाकणार आहोत.

    जगभरात टीव्ही तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. सध्याच्या जमान्यात एलईडी टीव्हींची मागणी वाढली आहे. मात्र हे टीव्ही खूप महाग असल्यानं सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाहीत. सध्या बाजारात अनेक नवीन कंपन्या आल्या असून स्वस्त आणि योग्य किमतीत ग्राहकांना एलईडी टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. Xiaomi, OnePlus, Motorola यांसारख्या कंपन्या स्वस्तात टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. अशाच काही टीव्हींवर आपण आज नजर टाकणार आहोत. एवढे पर्याय उपलब्ध असताना तुम्ही योग्य निवड करालच. 1) XIAOMI MI TV 4X चीनची ही मोबाईल उत्पादक कंपनी आपल्या मोबाईलसाठी लोकप्रिय आहे. शाओमीने नुकतंच बाजारात Mi LED Smart TV 4X हा टीव्ही आणला आहे. 50 इंचांचा UHD 4K टीव्ही असून तुम्हाला अवघ्या 29,999 रुपयांत मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला गूगल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले सर्व्हिसदेखील मिळेल. अँड्रॉइड 9.0 Pie या तंत्रज्ञान यात वापरलं आहे. 2) TCL चा IFFALCON 43K71 हा देखील एक अँड्रॉइड टीव्ही आहे. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि युट्युब सारखी अप इनबिल्ट मिळतील. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन टीव्हीच्या माध्यमातून याचा आनंद लुटू शकता. 43 इंचाचा हा टीव्ही तुम्हाला अवघ्या 23,999 रुपयांत मिळणार आहे तर 50 इंचाचा टीव्ही 28,499 रुपयांना मिळणार आहे. 3) MOTOROLA 43SAUHDM मोटोरोला कंपनीचा हा 4K टीव्ही 1GB आणि 8GB रॅममध्ये उपलब्ध आहे. Motorola 43SAUHDM हा 43 इंचांचा टीव्ही तुम्हाला अवघ्या 29,999 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये quad-core processor देखील असेल. 4) KODAK 43CA2022 कोडॅक कंपनीचा हा टीव्ही अतिशय स्वस्त किमतीत मिळणार आहे. सर्व प्रकारच्या एलईडी टीव्हींमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि फीचर्स तुम्हाला या टीव्हीमध्ये मिळणार आहेत. 30W साउंड आउट्पुटसह तुम्हाला यामध्ये दोन स्पिकर्स मिळणार आहेत. 43 इंचांचा हा टीव्ही तुम्हाला अवघ्या 23,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. 5) ONEPLUS 43Y1 स्मार्टफोनसाठी जगभरात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या OnePlus कंपनीनी आता टीव्ही मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे. हा देखील एक अँड्रॉइड टीव्ही आहे. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि युट्युबसारखी अप मिळणार आहेत. 24,999 रुपयांच्या स्वस्त किमतीत तुम्ही हा टीव्ही घेऊ शकता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या