मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

टेबल फॅन कूलरला सर्वोत्तम पर्याय; स्वस्त आणि मस्त असे टॉवर फॅन

टेबल फॅन कूलरला सर्वोत्तम पर्याय; स्वस्त आणि मस्त असे टॉवर फॅन

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे टॉवर फॅन्स उपलब्ध आहेत.

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे टॉवर फॅन्स उपलब्ध आहेत.

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे टॉवर फॅन्स उपलब्ध आहेत.

मुंबई, 08 जून : आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात दरदिवशी काहीतरी नवीन शोध लागत असतात. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे सुखसोयी देतील अशी उपकरणं बाजारात दाखल होत असतात. जुनी उपकरणं, साधनं मागे पडतात, नवीन उत्पादनं येतात. वापरण्यास अधिक सोपी, दिसायला सुंदर आणि अधिक फायदे देणारी उत्पादनं लोकप्रिय ठरतात. सध्या बाजारात अशाच एका उत्पादनाची मागणी वाढली आहे. हे उत्पादन म्हणजे अत्याधुनिक टॉवर फॅन (Tower fan).

खरंतर हे उत्पादन बाजारात येऊन बराच काळ लोटला आहे; पण कोरोना काळात पंख्यांची गरज अधिक भासली तेव्हा या उत्पादनाकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं. उंचीला जास्त असल्यानं हे दिसायला टॉवरसारखे दिसतात त्यामुळे यांना टॉवर फॅन असं नाव पडलं आहे. हे टॉवर फॅन्स टेबल फॅन (Table Fans) आणि कुलरला (Cooler) उत्तम पर्याय आहेत.

हे वाचा - तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे टॉवर फॅन्स उपलब्ध आहेत. अशाच काही स्वस्त आणि मस्त असे टॉवर फॅन्सची माहिती तुमच्यासाठी.

उषा प्लॅस्टिक फायबर टॉवर फॅन

उषा (Usha) या पंख्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीनं टॉवर फॅन्समध्येही आघाडी घेतली असून, अत्यंत आकर्षक आणि किमतीतही वाजवी असणारा उषा प्लॅस्टिक फायबर टॉवर फॅन दाखल केला आहे. संपूर्ण तांब्याची मोटार वापरण्यात आलेल्या फॅनमध्ये वेगवेगळे स्पीड सेटिंग्ज आणि 2 तासांचा मॅन्युअल टायमर आहे. बाजारपेठेत याची किंमत 3080 रुपये असून ऑनलाइन माध्यमातून तुम्ही तो 513 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता.

रसेल हॉब्स

रसेलहॉब्स कंपनीचा रसेल हॉब्स (Russel Hobs) आरटीएफ 4800 टॉवर फॅनमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असून त्यामुळे याची किंमतही अधिक आहे. 8990 रुपये किंमत असून 1498 रुपये हप्त्यानं हा खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये 12 तासांचा टायमर, तीन स्पीड लेव्हल, टेम्परेचर डिस्प्लेसह रिमोट कंट्रोल, एबीएस हाउसिंग अशी फीचर्स आहेत.

सिम्फनी ड्युएट आय-एस 6

कूलर्सच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या सिम्फनीनं (Symphoney) 6 लीटर क्षमतेचा हा टॉवर फॅन दाखल केला आहे. यामध्ये हनीकोंब कुलिंग पॅडसचा वापर करण्यात आला आहे. ऑटो रोटेशन, कंट्रोल पॅनेल आदी सुविधा यात आहेत. याची किंमत 6199 रुपये असून, ऑनलाइन बाजारपेठेत हा 1033 रुपयांच्या हप्त्यावर खरेदी करता येईल.

आयबेल डीलक्स टॉवर फॅन

आयबेल कंपनीचा (Ibell) वजनाला अतिशय हलका असा हा फॅन दूर अंतरापर्यंत हवा देतो. याची किंमतही अगदी कमी आहे. 2944 रुपयांत हा उपलब्ध आहे. ऑनलाइन बाजारपेठेत एचएसबीसी कार्डच्या सहाय्याने 5 टक्के सवलतीच्या दरात हा घेता येईल.

बजाज (Bajaj) स्नोवेंट

वजनाला अतिशय हलका असा हा अशा या फॅनमध्ये 150 वॅटची मोटर असून बटणाच्या सहायाने हा ऑपरेट करता येतो. याची किंमत अवघी 3848 रुपये आहे.

हे वाचा - WhatsApp चं नवं फीचर, पाहा काय होणार बदल

दिसायला अतिशय सुबक आणि देखणे असे हे टॉवर फॅन वापरायलाही सोपे आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येतात. घर, ऑफीस कुठेही हे शोभून दिसतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे.

First published:

Tags: Summer, Technology