मुंबई, 27 फेब्रुवारी: फोटो काढायला अनेकांना आवडतं. आताच्या काळात बहुतांश जण स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर फोटोग्राफीसाठी (Photography) करतात. स्मार्टफोन्सनी जणू सगळ्यांनाच फोटोग्राफर बनवलं आहे. कोणत्याही पर्यटनस्थळी गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या स्मार्टफोनमध्ये निसर्गाची सुंदर दृश्यं टिपतात. सध्या चांगल्या क्षमतेचे कॅमेरे असलेले एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन्स (Best Mobile for Photography) बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि आयुष्यातले अविस्मरणीय क्षण टिपायचे असतील, तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांत बाजारात 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेले अनेक स्मार्टफोन्स आले आहेत. या स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळत असून, हे बजेटमध्येदेखील बसणारे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही निवडक स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.
रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max)
शाओमीची सब ब्रँड कंपनी असलेल्या रेडमीने स्टायलिश कॅमेरे असलेले अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यात रेडमीचा नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोनदेखील कमी बजेट असणाऱ्यांकरिता एक चांगला पर्याय आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 8 MP अल्ट्रा-वाइड, 2 MP पोर्ट्रेट आणि 5 MP मॅक्रो मोड यांसह 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. या फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं, तर या फोनला 6.67 इंची सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5020 mAh बॅटरी आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते आहे.
हे वाचा-Smartphones वर जबरदस्त ऑफर! 500 रुपयात खरेदी करा हा 5G फोन
रिअलमी 8 प्रो (Realme 8 Pro)
रिअलमी 8 प्रो हा 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम असलेला चांगला फोन आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तसंच 108-मेगापिक्सेलच्या प्राथमिक सेन्सरसह 8 मेगापिक्सेलचा एक आणि 2 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनला 6.4 इंचांचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 4500mAh बॅटरी आहे.
हे वाचा-Facebook देतंय कमाईचा गोल्डन चान्स! Reels Videos मधून मिळवता येणार पैसे
मोटोरोला मोटो G60 (Motorola Moto G60)
मोटोरोला मोटो G60 फोनची किंमत 16,999 रुपये आहे. 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.78 इंची मोठा डिस्प्ले आहे. Moto G60 स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. 6000 mAh बॅटरी या फोनला देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Smartphones