Home /News /technology /

शाओमी आणि नोकियाचे दमदार TV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

शाओमी आणि नोकियाचे दमदार TV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TV

TV

मोठी स्क्रीन आणि 4K टीव्ही हे आता सर्वसामान्यांनाही परवडणार, खिशाला परवडणाऱ्या 4K टीव्हीविषयी जाणून घेऊ.

    मुंबई, 03 सप्टेंबर : मोठी स्क्रीन आणि 4K टीव्ही हे आता मर्यादित प्रमाणात आणि श्रीमंतांसाठी राहिले नाहीत. आता तुम्हाला परवडतील असे अनेक टीव्ही बाजारात दाखल झाले आहेत. त्यामध्येच आता भर पडली आहे ती म्हणजेच 4K टीव्हीची ज्यामध्ये गुगल प्ले स्टोअर ,इनबिल्ट अप अशा एकनाअनेक सुविधा आहेत . चला तर मग, अशाच खिशाला परवडणाऱ्या 4K टीव्हीविषयी जाणून घेऊ. KODAK 4K HDR ANDROID TV कोडॅक कंपीनीचा हा टीव्ही फक्त गुगल प्ले स्टोअर बरोबरच नाही तर HD आणि 4K सपोर्ट बरोबर मिळतो. या टीव्हीत 4K (3840x2160) रिझोल्युशन आहे. तसंच HDR 10 फिचर बरोबर डॉल्बी व्हिजन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. इतर टीव्हींपेक्षा याची स्क्रीन १५ टक्के मोठी आहे. 43-इंचांच्या मॉडेलची किंमत 23,999 रुपये आहे. तर 65 इंचांच्या मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे. THOMSON OATH PRO 4K HDR ANDROID TV फ्रेंच ब्रँडचा हा टीव्ही भारतामध्ये तयार होतो. या 43 इंचांच्या टीव्हीमध्ये 500 नीटस तर ५५ आणि ६५ इंचांच्या टीव्हीत ५५० नीटस इतका ब्राइटनेस दिला आहे. या टीव्ही मध्ये IPS panel आणि रिफ्रेश रेट हा 60Htzआहे. या अँड्रॉईड टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट इन व्हॉईस, रिमोट कंट्रोल फीचर्स तसेच पॉप्युलर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म देण्यात आले आहेत. याच्या 43-इंचांच्या टीव्हीची किंमत 24,999 रुपये आहे तर 65-इंचांच्या टीव्हीची किंमत 52,999 रुपये आहे. हे वाचा-विना इंटरनेट असं वापरा गूगल मॅप; ऑफलाईन GPS वापरण्याची सोपी ट्रिक XIAOMI MI TV 4X TV शाओमीच्या 4X टीव्हीच्या ताफ्यात आता एका 4K टीव्हीची भर पडली आहे. टीव्ही HDR १० या सपोर्ट फिचर बरोबर मिळतो. या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजनची सुविधा नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फिल्म आणि टीव्ही शो असणार आहेत. ताईच डेटा सेव्हर फिचर सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे. याच्या टीव्हीची किंमत 24,999 रुपयांपासून 54,999 रुपये अशी आहे. NOKIA TV नोकिया कंपनीचा टीव्ही 4K सपोर्टबरोबर येत आहे. या टीव्हीमध्ये HDR 10 फिचर बरोबर डॉल्बी व्हिजन सुविधा देण्यात आल्या आहेत. याचे खास असे फिचर म्हणजेच याचे समोर असणारे स्पीकर्स. इतर टीव्हीपेक्षा याचे स्पीकर उत्तम साउंड देतात. JBL कंपनीचे स्पीकर याला बसवण्यात आले आहेत. याच्या 43-इंचांच्या टीव्हीची किंमत 31,999 रुपये आहे तर 55-इंचांच्या टीव्हीची किंमत 41,999 रुपये इतकी आहे. हे वाचा-खोट्या ईमेलपासून सावधान; बँकिंग फ्रॉडबाबत RBIचा इशारा TCL P715 TCL P715 या टीव्हीमध्ये मायक्रोफोनची सुविधा देण्यात आली आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या आवाजाने टीव्हीचे फिचर कंट्रोल करू शकता. या टीव्हीमध्ये 4K पॅनलबरोबर HDR 10 या सपोर्ट फिचर बरोबर येत आहे. या 43-इंचांच्या टीव्हीची किंमत 28,999 रुपये आहे तर 75-इंचांच्या टीव्हीची किंमत 99,999 रुपये इतकी आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Techonology

    पुढील बातम्या