मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्वस्तात मस्त ऑफर! 7 हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळतोय नवीन फोन

स्वस्तात मस्त ऑफर! 7 हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळतोय नवीन फोन

 स्वस्तात चांगला कोणता मोबाईल निवडावा असा प्रश्न पडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

स्वस्तात चांगला कोणता मोबाईल निवडावा असा प्रश्न पडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

स्वस्तात चांगला कोणता मोबाईल निवडावा असा प्रश्न पडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

मुंबई, 23 जानेवारी: सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन येत आहेत. वाढती स्पर्धा आणि महागडे फोन यांचं ताळमेळ आपल्या बजेटला बसणारं हवं असल्यानं सगळेच जण स्वस्तात जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्यावर भर देत असतात. काहीवेळा आपल्या प्रिय व्यक्तींना देण्यासाठी मोबाईल खरेदी करायचा असतो. अशावेळी नेमका स्वस्तात चांगला कोणता मोबाईल निवडावा असा प्रश्न पडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

वाढत्या स्पर्धेतही तुमच्या बजेटमध्ये बसणारे मोबाईल कोणते आहेत आज याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Moto E6s-मोटोरोला कंपनीचा E6S मोबाईल ऑनलाईन तुम्हाला 6,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. मात्र रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्हाला हा मोबाईल 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. 6.1 इंच HD डिस्प्ले, 13 अधिक 2 मेगापिक्सल कॅमेरा आणि सोबतच 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

Nokia 4.2- मोटोरोला सोडून तुम्हाला इतर ब्राण्डमध्ये पाहायचं असेल तर नोकिया सध्या चांगला पर्याय आहे. नोकिया 4.2मध्ये 3 GB रॅम, 13 अधिक 2 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या मोबाईलची मूळ किंमत 12, 999 रुपये होती मात्र आता ई कॉमर्स साईटवर तुम्हाला हा फोन 5,999 रुपये म्हणजे तब्बल 6 हजार रुपयांची सूट या मोबाईलवर तुम्हाला मिळणार आहे.

हेही वाचा-Samsung Galaxy S10 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honor 7C- Honor कंपनीचा 7C- मोबाईल ग्राहकांना 6,990 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. 3 GB आणि 32 GB, 4 आणि 64 GB अशा दोन वेरियंटमध्ये हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होणार आहे. 13 अधिक 2 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. यासोबत 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा ग्राहकांना मिळणार आहे.

Coolpad Cool 5-कूलपॅड कंपनीचा मोबाईल तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 9 हजार होती मात्र सेलमध्ये 2 हजार रुपये डिस्काऊंट मिळत आहे. 6.22 इंच डिस्प्ले, 13 अधिक 2 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा ग्राहकांना मिळणार आहे.

Realme C2-या मोबाईलची किंमत 5,999 रुपये आहे. 6.1 इंच डिस्प्ले 2 आणि 3 जीबी रॅम अशा दोन वेरियंटमध्ये हा मोबाईल उपलब्ध आहे. या मोबाईलसाठी 13MP+2MP प्रायमरी कॅमेरा तर 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्डवर सेल सुरू आहे. त्यावरही तुम्ही हे मोबाईल पाहू शकता. तिथे वेगवेगळ्या ऑफर्समध्ये आणखी चांगला मोबाईल वेगवेगळ्या ऑफर्समध्ये मिळू शकतो.

हेही वाचा-WhatsApp अपडेट! Dark Mode सुरू करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

First published:
top videos

    Tags: Nokia, Realme, Techonology