तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? मग करून पाहा 'हे' सोपे उपाय

तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? मग करून पाहा 'हे' सोपे उपाय

मोबाईलमध्ये बॅटरी हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बॅटरीचं लाईफ टिकवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर: धावपळीच्या रुटीनमध्ये सध्या फोन ही अत्यावश्यक गोष्ट दिवसेंदिवस होत चालली आहे. अगदी छोट्या कामांपासून ते कम्प्यूटरवरही काही काम ते ऑफिसच्या कामांपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या एका फोनवर होतात. धावपळ आणि फोनच्या सतत वापरामुळे फोनची बॅटरी संपते किंवा बऱ्याचवेळी फोन पूर्ण चार्ज करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुमच्या फोनची बॅटरी टिकवण्यासाठी हे काही सोपे उपाय तुम्ही केलेत तर तुमचा मोबाईल तुम्हाला जास्त वेळ वापरून काम करता येईल.

मोबाईलमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. बॅटरी संपली की मोबाईवर काहीच करता येत नाही. सध्याच्या नव्या मोबाईलमध्ये आता लीथीयम आयन बॅटरीचा वापर केल्यानं आधीच्या तुलनेत ती जास्त टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचं लाईफ आणखी वाढून उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होणार

सॉफ्टवेयर अपडेट करा

तुमच्या मोबाईलमधील सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. अडॉप्टिव ब्राइटनेस आणि अडॉप्टिव बॅटरी हे फिचर्स तुमच्या फोनमध्ये सुरू ठेवा. अडॉप्टिव ब्राइटनेसमुळे मोबाईल ऑटोमॅटिकली हवा तसा प्रकाश अॅडजेस्ट करतो. त्यामुळे बॅटरीचा वापर जास्त होत नाही.

मोबाईलमधील रनिंग अॅप क्लिअर करा

मोबाईलमध्ये कायम आपलं काम झाल्यानंतर रनिंग अॅप्लिकेशन क्लिअर करावं. बॅग्राऊंडला अॅप्लिकेशन सुरू राहिल्यास मोबाईलच्या मेमरीवरही जास्त भार येतो आणि बॅटरीही वापरली जाते.

शार्ट ड्युरेशनवर चार्ज करा.

आताचे मोबाईलमध्ये बऱ्याचदा लीथियम आयन बॅटरीचा वापर असतो. त्यामुळे शॉर्ट चार्जिंगसाठी योग्य आणि उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण उतरेपर्यंत वाट न पाहता तुम्ही चार्ज करू शकता. घाबरू नका तुमचा फोन आधी 57 टक्के चार्ज असेल तर तो त्या पुढे चार्जिंग होत राहिल. संपूर्ण बॅटरी उतरल्यानंतर सतत चार्ज केल्यानं बॅटरीचं आयुष्य कमी होतं. साधारण तुमच्या मोबाईलची बॅटरी ही किमान 50 ते कमाला 80 टक्के चार्ज असणं आवश्यक आहे. प्रयत्न करा की 20 टक्क्यांपेक्षा कमी सतत बॅटरी डाऊन राहात असेल तर त्यामुळे माबाईलचं आयुष्य कमी होऊ शकतं.

सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव

स्टँडर्ड आणि ओरिजनल चार्जरचा वापर

तुमचा मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करा. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते. काहीवेळा सुपरफास्ट चार्जिंग करणाऱ्या कॉर्ड आणि अॅडप्टर बाजारात उपलब्ध असतात मात्र त्यांचा वापर टाळावा. लीथियम आयन बॅटरी जेवढी हळूहळू चार्ज होईल तेवढा चांगला रिझर्ट मिळेल.

मोबाईल किंवा बॅटरी जास्त गरम होऊ देऊ नका

तुमचा फोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल. अति तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. तुमचा फोन टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नका ज्यामुळे त्याच्या बॅटरीवरही परिणाम होतो. उन्हामध्ये फोन गरम होतो अशावेळी बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन काहीवेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा त्यामुळे बॅटरी नॉर्मवर येण्यास मदत होते.

फोन पाण्यात पडला किंवा फोनमध्ये पाणी गेलं तरीही बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जवळच्या केअर सेंटरला भेट देऊन त्यांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

Published by: Kranti Kanetkar
First published: September 21, 2019, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading