Home /News /technology /

Best Feature Phones: स्वस्तात मस्त आणि जबरदस्त.... 2 हजारांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा हे बेस्ट फोन्स

Best Feature Phones: स्वस्तात मस्त आणि जबरदस्त.... 2 हजारांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा हे बेस्ट फोन्स

Image Credit: Nokia

Image Credit: Nokia

या मोबाइल फोन्सना मागणी असल्याने काही चांगल्या ब्रँडकडून तसे फोन्स बाजारात विकले जात आहेत. त्यातले 2000 रुपयांच्या आतले (Budget Mobile Phones) काही चांगले पर्याय पाहू या.

    नवी दिल्ली, 8 जानेवारी : आजकाल बहुतांश जणांकडे स्मार्टफोन असतो आणि टच स्क्रीनचा फोन जणू मस्टच झाला आहे. स्मार्टफोन्सला जास्त पसंती असतानाही जुने मोबाइल्स म्हणजेच फीचर फोन्सचं उत्पादन थांबलेलं नाही. कारण फीचर फोन्स भारतात खूपच स्वस्तात म्हणजे अगदी 2000 रुपयांमध्येही (Mobiles Under rs. 2,000) उपलब्ध आहेत. एवढ्या कमी किमतीत तुम्ही चांगला साधा फोन खरेदी करू शकता. या मोबाइल फोन्सना मागणी असल्याने काही चांगल्या ब्रँडकडून तसे फोन्स बाजारात विकले जात आहेत. त्यातले 2000 रुपयांच्या आतले (Budget Mobile Phones) काही चांगले पर्याय पाहू या. जिओ फोन (रुपये 1,999) : रिलायन्स जिओच्या ‘जिओ फोन’ची (Jio Phone) ऑफर खूपच आकर्षक आहे. या जिओ फोनसोबत तुम्हाला 2 वर्षांचं अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग फक्त रुपये 1999 मध्ये मिळतं. या जिओ फोनला 2.4 इंच टीएफटी डिस्प्ले असून, त्यासोबत ड्युअल कोअर आर्म कोर्टेक्स प्रोसेसर 512 एमबी रॅम आणि 4 जीबीचं इंटर्नल स्टोरेज मिळतं. या मोबाइल फोनला फ्रंट आणि बॅक कॅमेरा असून, दोन्ही ठिकाणी 0.3 मेगापिक्सेल शूटर्स आहेत. फोनला 1500 mAhची बॅटरी आहे. ती तब्बल 9 तासांपर्यंत चालते. यातली उत्तम फीचर्स आणि दोन वर्षांच्या फ्री कॉलिंगमुळे 1999 च्या मोबाइल फोनच्या यादीत जिओ फोन वरचढ ठरतो. मोटो A70 : मोटो A70 (Moto A70) हा मोटोरोलाच्या 1999 रुपयांचा मोबाइल फोन असून, तो तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. या फीचर फोनचं स्टोरेज तुम्ही 32 जीबीपर्यंत वाढवू शकता. या फोनची बॅटरी 1,750 एमएएच असून ती रिमूव्हेबल आहे. याला 2.4 इंचेस टीएफटी डिस्प्ले आहे. हा मोबाइल फोन 0.3 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसोबत येतो. वाचा : Facebook वापरताना चुकूनही करू नका अशी पोस्ट, एका चुकीमुळे थेट होईल तुरुंगवास नोकिया 150 : द नोकिया 150ची (The Nokia 150) किंमत 2000 रुपये असून तो फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या मोबाइल फोनमध्ये मोटो A70 सारखी सर्व स्पेसिफिकेशन्स आहेत. या मोबाइलमध्ये 4 एमबी रॅम आणि 4 एमबीचं इंटर्नल स्टोरेज असून ते 32 जीबीपर्यंत वाढवता येईल. या फीचर फोनला 0.3 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह असून, 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 1,020 एमएएचची रिमूव्हेबल बॅटरी असून मायक्रो-यूएसबी चार्जिंग आहे. लाव्हा A9 (रुपये 1,655) : द लाव्हा A9 (The Lava A9) हा फोन फक्त 1,655 रुपयांना असून, तो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला खरेदी करता येईल. द लाव्हा A9 ला 2.8 इंचेसचा डिस्प्ले आणि 1,700 एमएचची बॅटरी असून ती तब्बल 5 दिवस चालते, असा दावा करण्यात आला आहे. हा फोन 1.3 मेगापिक्सेल कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत असून यामध्ये प्राउडली इंडियन आणि वेव्ह अशा दोन एडिशन्स आहेत. वाचा : Honda Cars वर बंपर ऑफर्स, केवळ 31 जानेवारीपर्यंत स्वस्तात कार खरेदीची संधी मायक्रोमॅक्स X756 (रुपये 1,795) : 1,795 रुपये किंमत असलेला मायक्रोमॅक्स X756 हा फोन 2.4 इंच डिस्प्लेसह असून, 167PPI पिक्सेल एवढी डेन्सिटी आहे. या स्मार्टफोनला 3,000 एमएएच रिमूव्हेबल बॅटरी आहे. फ्लॅश नसलेला 0.3 मेगापिक्सेलचा कॅमेरा फोन आहे. मायक्रोमॅक्स X756 हा ड्युएल सिमचा मोबाइल फोन आहे. नोकिया 110 : नोकिया 110 ची किंमत 1,599 रुपये एवढी असून तो नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन गुलाबी आणि निळ्या रंगात असून, तो टिल किंवा काळा दिसतो. 1.77 इंचाचा डिस्प्ले फोनला असून, याचं स्टोरेज 32 जीबीपर्यंत वाढवता येईल. नोकिया 110 या फोनला 800 एमएएच बॅटरी असून, तो एका चार्जिंगमध्ये 14 तासांपर्यंत टॉकटाइम देतो, असा कंपनीचा दावा आहे. यातला रिअर कॅमेरा विना फ्लॅशचा आहे. वाचा : तुमच्या कामाची बातमी! मोबाइल फोनवर अ‍ॅक्टिवेट करा mAadhaar, असे होतील फायदे लाव्हा फ्लिप : लाव्हा फ्लिपची किंमत 1,820 रुपये एवढी असून, तो कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हा जुन्या मोबाइल्सची आठवण करून देणारा फ्लिप फोन आहे. हा फोन 3 दिवसाचा बॅटरी बॅकअप आणि व्हीजीए कॅमेरासोबत येतो. या फ्लिप फोनला 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 1,200 एमएचची बॅटरी आहे. लाव्हा फ्लिप फोनला एलईडी नोटिफिकेशन लाइट्स आहेत. तुम्हीही साधा फीचर फोन घेण्याच्या विचारात असाल तर वरीलपैकी पर्याय नक्की पाहा.
    First published:

    Tags: Mobile Phone, Reliance Jio

    पुढील बातम्या