Home /News /technology /

आरोग्याची काळजी घेणारं स्मार्ट DEVICE, सर्वात स्वस्त आणि मस्त जाणून घ्या फीचर्स

आरोग्याची काळजी घेणारं स्मार्ट DEVICE, सर्वात स्वस्त आणि मस्त जाणून घ्या फीचर्स

सगळ्यांनाच महागडं स्मार्टवॉच परवडत नाही अशावेळी ही डिव्हाइस तुमच्या कामी येऊ शकते.

    मुंबई, 01 ऑक्टोबर: आजच्या या धकाधकीच्या जीवनात आरोग्याचं महत्त्व खूप वाढलं आहे. त्यामुळं दररोज जिममध्ये व्यक्ती जातोच. पण याठिकाणी आपण गेल्यावर आपण काय व्यायाम करतो आणि आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयवाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम फिटनेस बँड करत असतात. तुम्ही झोपेत असताना देखील हे फिटनेस बँड त्यांचं काम करत असतात. सगळ्यांनाच महागडं स्मार्टवॉच परवडणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही फिटनेस बँडची माहिती घेऊन आलो आहोत. 1) MI SMART BAND 4 Mi Smart Band 4 या स्मार्टबँडमध्ये तुम्हाला अपलच्या स्मार्टवॉचप्रमाणे सर्व सुविधा मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला इनकमिंग कॉल, जीमेल आणि whatsapp सारख्या सुविधा देखील मिळणार आहेत. यामध्ये हृदयाचे ठोके, तुम्ही किती पावले चालला आहात हे देखील मोजले जाणार आहे. जर तुम्ही 2000 ते 3000 रुपये खर्च करायला तयार असाल तर हा बँड तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. 2) HONOR BAND 5 ऑनरच्या बँड ५ मध्ये तुम्हाला TruSleep, TruSense यांसारखी सुविधा मिळणार आहे. इतर बँड्सप्रमाणे यामध्ये हृदयाचे ठोके, तुम्ही किती पावलं चालला हे मोजलं जाईल. त्याचबरोबर अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टीमवर हे बँड चालणार आहे. 2299 रुपयांत तुम्ही हा बँड खरेदी करू शकता. हे वाचा-IPL 2020 : आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन, खेळाडूने बॉलला लाळ लावली, VIDEO VIRAL 3) SAMSUNG GALAXY FIT E यामध्ये तुम्हाला walking, running and dynamic workout अशा तीन सुविधा मिळणार आहेत. हृदयाचे ठोके देखील यामध्ये मोजले जाणार आहेत. त्याचबरोबर स्विमिंग करताना देखील तुम्ही हा बँड घालून तुमच्या हृदयाचे ठोके मोजू शकता. 2,599 रुपयांना तुम्ही हा बँड विकत घेऊ शकता. 4) REALME BAND Realme Band तुम्ही पायी व्यायाम करताना, सायकल चालवताना, आणि कोणत्याही प्रकारची चढाई करताना देखील हे बँड वापरू शकता. WhatsApp, Twitter, Facebook, Instagram यांसारखी सोशल मीडिया अप्स देखील तुम्ही या बँडमध्ये वापरू शकता. 1499 रुपयांमध्ये तुम्ही हा बँड खरेदी करू शकता. हे वाचा-Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक 5) GOQII VITAL ECG ACTIVITY TRACKER WhatsApp, SMS, email आणि calls यासारखी सुविधादेखील तुम्हाला मिळणार आहे. याचबरोबर हृदयाचे ठोके, तुमची पावलं मोजण्याचं काम देखील हे बँड करणार आहेत. यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन देखील करण्यात येणार असून nutritionist, personal trainer आणि wellness expert निवडण्याची संधी दिली जाणार आहे. 3,324 रुपयांमध्ये तुम्ही हा बँड खरेदी करू शकता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या