मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

6 GB रॅम असलेले हे आहेत 5 बेस्ट स्मार्टफोन्स

6 GB रॅम असलेले हे आहेत 5 बेस्ट स्मार्टफोन्स

जर तुम्ही 6 GB रॅम असलेला स्मार्टफोन (Smart Phones) खरेदी करु इच्छित असाल, तर या 5 फोन्स विषयी जाणून घ्या.

जर तुम्ही 6 GB रॅम असलेला स्मार्टफोन (Smart Phones) खरेदी करु इच्छित असाल, तर या 5 फोन्स विषयी जाणून घ्या.

जर तुम्ही 6 GB रॅम असलेला स्मार्टफोन (Smart Phones) खरेदी करु इच्छित असाल, तर या 5 फोन्स विषयी जाणून घ्या.

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : स्मार्टफोन्स खरेदी करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम फोन्सची किंमत बघतो. त्यातील फिचर्सचा विचार केला तर आपले प्राधान्य हे चांगला कॅमेरा, जास्त रॅम (Ram), स्टोरेज आणि प्रोसेसरला असते. रॅम चांगली असली तर फोन हॅंग होत नाही. सध्याच्या काळात आपली बहुतांश कामे ही फोनवरच होतात. त्यामुळे आपल्या कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी रॅम चांगली असणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुम्ही 6 GB रॅम असलेला स्मार्टफोन (Smart Phones) खरेदी करु इच्छित असाल, तर या 5 फोन्स विषयी जाणून घ्या. व्हिवो वाय 20 (Vivo Y20) : या फोनमध्ये ग्राहकांना 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. पांढरा, काळा आणि निळा या तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनचा डिस्प्ले 6.51 इंच एचडी+आहे. यात 13 मेगापिक्सल+2 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल चे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 (Samsung Galaxy F41) : या पावरफूल फोनमध्ये ग्राहकांना 6 GB रॅम देण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.4 इंचाचा sAMOLED Infinity-U डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोनमध्ये कंपनीचा Exynos9611 हा प्रोसेसर आहे. या फोनला अ‍ॅण्ड्रॉईड 10 बेस्ड सॅमसंगचा OneUI स्क्रिन आहे. गॅलॅक्सी F41च्या रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेंस 5 मेगापिक्सलचा डेप्थसेंन्सर या फोनमध्ये देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) : या फोनमध्ये 6 GB रॅम, 90Hz रिफ्रेशसह 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनला बॅक आणि फ्रंटला कार्निंग गोरिला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. यात क्वाड कॅमेरा सेटअप असून युझर्सला फोनमागे चार कॅमेरे उपलब्ध होतील. या फोनची बॅटरी 4115mAh आहे. रिअलमी 7 (RealMe 7) : या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी आहे. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा आहे. याचा डिस्प्ले 6.5 इंच फूल एचडी+ आहे. फोनमध्ये 5000mAhची बॅटरी आहे. पोको एम 2 (POCO M2) : यात 6 GB रॅम आहे. फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमर सेंन्सर आहे. फोनची बॅटरी 5000mAhची आहे. या फोनमध्ये तुम्ही मायक्रो एसडीकार्ड देखील वापरु शकता. ब्रिक रेड, स्लेट ब्लू, आणि पिच ब्लॅक या रंगात हा फोन उपलब्ध आहे.
First published:

Tags: Mobile, Smart phone

पुढील बातम्या