Diwali Offers: Suzukiच्या 'या' वाहनांवर आकर्षक ऑफर; सोन्या-चांदीचं नाणं, स्विफ्ट जिंकण्याची संधी

Diwali Offers: Suzukiच्या 'या' वाहनांवर आकर्षक ऑफर; सोन्या-चांदीचं नाणं, स्विफ्ट जिंकण्याची संधी

सुझुकी, वाहन खरेदीवर 5 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. त्याशिवाय पेटीएमने (Paytm) पेमेंट केल्यास, 8 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सुझुकीने (Suzuki) दिवाळीपूर्वी आपल्या बाईक आणि स्कूटरच्या काही मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. सुझुकीच्या Burgman Street आणि Access 125 स्कूटरवर जबरदस्त दिवाळी ऑफर मिळू शकते. त्याशिवाय Suzuki Gixxer 250 आणि Intruder बाईकवरही सवलत मिळणार आहे.

मारुती स्विफ्ट जिंकण्याची संधी -

कंपनी आपल्या बाईक आणि स्कूटर खरेदी करणाऱ्या तीन लकी ग्राहकांना, मारुती सुझुकी जिंकण्याची संधी देत आहे. ही ऑफर कंपनीच्या सर्व शोरुमवर उपलब्ध आहे.

(वाचा - 4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त, किंमत कमी)

सोन्या-चांदीची नाणी जिंकण्याची संधी -

सुझुकीच्या बाईक किंवा स्कूटर खरेदीवर सोनं किंवा चांदीचं नाणं जिंकण्याची संधी आहे. ग्राहकाकडून गाडी खरेदीवर 1 ग्रॅम सोनं किंवा 10 ग्रॅम चांदीचं नाणं जिंकता येऊ शकतं.

(वाचा - FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण)

एक्सचेंज आणि कॅशबॅक ऑफर (Exchange offer, Cashback) -

सुझुकी, वाहन खरेदीवर 5 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. त्याशिवाय पेटीएमने (Paytm) पेमेंट केल्यास, 8 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळू शकतो. हा फायदा बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही मिळतो आहे.

(वाचा - ..अन्यथा अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)

स्वस्त EMI सह इतर फायदे -

सुझुकीकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त EMI ची ऑफरही देण्यात येत आहे. त्याशिवाय 13 हजार रुपयांपर्यंतचा फायनान्स बेनिफिटही मिळू शकतो. सुझुकी एकूण 18 हजारांपर्यंत इतर फायदे देत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 27, 2020, 11:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या