नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया
(SBI) अकाउंट होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेने पॅन आणि आधार कार्ड
(PAN and Aadhaar card) लिंक करणं आवश्यक केलं आहे. देशभरातील आपल्या लाखो युजर्सला दिली बँकेने ही माहिती आहे. SBI ने ट्विट करत आपल्या ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवीय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन आधारशी जोडण्याचा सल्ला
(PAN - Aadhaar Link) दिला आहे. बँकेने युजर्सला लास्ट तारखेपूर्वी हे काम करण्याचं सांगितलं, अन्यथा त्यांच्या नेट बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा बँकेने दिला आहे.
बँकेने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार, 1961 कायद्याच्या कलम 139AA नुसार, 31 मार्च 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे. हे काम न केल्यास युजर्सची सर्विस बंद होऊ शकते. त्यामुळे SBI युजर्स 31 मार्चपूर्वी आपलं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा.
Aadhaar Card शी कसं लिंक कराल PAN Card -
- आयकर अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.
- होमपेजवर Link Aadhaar वर क्लिक करा.
- त्यानंतर नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, तिथे पॅन-आधारचे डिटेल्स टाकावे लागतील.
- डिटेल्स आणि कॅप्चा कोड वेरिफाय करा आणि OTP पर्याय निवडा.
- Link Aadhaar टॅबवर Next वर क्लिक करा आणि पॅन-आधार कार्ड लिंक होईल.
SMS द्वारे असं करा PAN - Aadhaar Link -
SMS द्वारे 567678 किंवा 56161 नंबरवर मेजेस पाठवून आधार-पॅन कार्ड लिंक करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.