Home /News /technology /

Beeper चा बोलबाला! सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

Beeper चा बोलबाला! सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

Beeper - News18 lokmat

Beeper - News18 lokmat

New App Alert: बीपर (Beeper) हे नवीन एप्लिकेशन iMessage सुद्धा अँड्रॉइड, विंडोज आणि लिनक्सवर ओपन करू शकतं; पणत्यासाठी काही ट्रिक्स वापराव्या लागतात.

नवी दिल्ली,23 जानेवारी : सर्व मेसेजिंग Apps एकाच ठिकाणी आणणारं ‘बीपर’ (Beeper) हे एक नवीन Mobile App दाखल झालं असून, पेबल स्मार्टवॉचचे (Pebble Smartwatch) संस्थापक, एरिक मिगीकोव्हस्की यांनी हे अनोखं App तयार केलं आहे. हे App 15 मुख्य Messaging Apps किंवा सेवांसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करते. यासाठी दरमहा 10 डॉलर्स म्हणजे साधारण 730 रुपये शुल्क द्यावं लागतं. बीपरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की, ते अँड्रॉईडवर (Android) आय मेसेज (iMessage) ची यंत्रणा चालवू शकतं. या नवीन अ‍ॅपची घोषणा करताना, संस्थापक एरिक मिगिकोव्हस्की म्हणाले की, बीपर अँड्रॉइड, विंडोज आणि लिनक्सवरही आय मेसेज कार्यान्वित करू शकते; पण यासाठी काही विशिष्ट तंत्राचा वापर करणं आवश्यक आहे. बीपर पूर्वी नोव्हाचॅट (Novachat) म्हणून ओळखले जात असे. विंडोज, मॅक, लिनक्स, आयओएस आणि अँड्रॉइड अशा सर्वच प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप काम करतं. मॅट्रिक्सचा (Matrix) वापर करुन मेसेजेस या अ‍ॅपला जोडलेले असून, तो  ओपन-सोर्स फेडरेट मेसेजिंग प्रोटोकॉल आहे. प्रत्येक मेसेजिंग क्लायंटसाठी बीपर दुवा म्हणून कार्य करते. सध्या व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्लॅक, मेसेंजर, एसएमएस, डिसकॉर्ड, स्काईप, आयआरसी, ट्विटर डीएम, अॅपल आयमेसेज आणि गुगल हँगआउट असे 15 महत्त्वाचे मेसेजिंग अ‍ॅप्स बीपरने एकत्र आणले आहेत. यापैकी प्रत्येक अ‍ॅप त्यांचे संदेश एकाच ठिकाणी फीड करतो आणि युजर बीपरमधूनच या सर्व अॅप्सवरील मेसेजेसना प्रतिसाद देऊ शकतात.

बीपरच्या वेबसाइटवरील एफएक्यूजमध्ये (FAQs)कंपनी म्हणते की, आयमॅसेजेस अँड्रॉइड आणि विंडोजवर कसे कार्यान्वित करता येतील, हे शोधणे कठीण होते. अँड्रॉइड, विंडोज आणि लिनक्स युजर्सना आयमेसेज वापरण्यासाठी बीपरवर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे ते प्रत्येक युजरला बीपर अ‍ॅप इन्स्टॉल केलेला  जेलब्रोकन आयफोन पाठवते. हे आयमेसेजबरोबर दुवा साधण्याचे काम करते. युजरकडे नेहमीच इंटरनेटशी कनेक्ट केलेला मॅक असल्यास ते बीपर मॅक अॅप इन्स्टॉल करू शकतात जो एक दुवा  म्हणून कार्य करतो. मिगीकोव्हस्की म्हणाले की, अॅपल डिव्हाईस नसल्यास कंपनी पैसे भरून सेवा घेणाऱ्या ग्राहकांना जेलब्रोकन आयफोन पाठविण्याची योजना आखत आहे. हे देखील वाचा - Airtel चे 2 नवे रिचार्ज प्लॅन लाँच; केवळ 78 रुपयांत 5GB डेटासह मिळेल अनलिमिडेट म्युझिक हा नवीन प्लॅटफॉर्म चांगला वाटला तरी, बीपर वेबसाइट एन्क्रिप्शनविषयी(Encription) कोणतीही माहिती देत नाही. अर्थात हे अ‍ॅप सध्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असल्यानं प्रत्येकासाठी उपलब्ध नाही.  बीपरच्या योजनेवर एनक्रिप्शनची माहिती पुरवण्याबाबत बीपरची काय योजना आहे, अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या बीपर त्यांची सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर एक फॉर्म भरण्यास सांगते. त्यानंतर बीपरकडून ग्राहकांना इन्व्हिटेशन पाठवून त्यांची सेवा सुरू केली जाते.
Published by:news18 desk
First published:

Tags: Mobile app, Technology, Whatsapp

पुढील बातम्या