नवी दिल्ली, 17 जून : Smartphone हॅक होण्याचे आणि फ्रॉडची प्रकरणं सतत वाढत आहेत. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणं, सावध राहणं गरजेचं आहे. हॅकिंग, फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करणं आणि अपडेट करणं फायद्याचं ठरू शकतं.
लोकेशन टर्न ऑफ -
युजर्सनी आपल्या प्रायव्हसीसाठी फोन लोकेशन टर्न ऑफ ठेवावं. ज्यामुळे अॅप्स तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही. आयफोन आणि अँड्रॉईड युजर्सने फोन सेटिंगमध्ये बदल करुन लोकेशन टर्न ऑफ, लोकेशन हिस्ट्रीसह अॅप्स अॅक्सिस हटवावा.
सोशल मीडिया लॉगइन -
फोनमध्ये अनेक अॅप्स आणि वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटरला लॉगइन करण्याची परवानगी देतात. परंतु असं करणं धोकादायक ठरू शकतं. अनेक अॅप्स तुमची पर्सनल माहिती फेसबुक आणि ट्विटरवरुन चोरी करतात. जर एखादं अॅप किंवा वेबसाईट अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करत असेल, तर त्याचा वापर करू नये. अनेक गेमिंग अॅप्सही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती मागतात. परंतु असे अॅप्स अॅक्सेस करू नयेत.
Personalize ad -
गुगल आपल्या अनेक अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतो. त्यामुळे पर्सनल अॅडमधून बाहेर पडणं फायद्याचं ठरतं. यासाठी फोन सेटिंगमध्ये जावं लागेल. गुगल अॅडमध्ये Unable Opt out of Ads Personalization वर क्लिक करावं लागेल.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.