व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या मेसेजपासून सावध राहा, तुमची माहिती होईल Leak

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या मेसेजपासून सावध राहा, तुमची माहिती होईल Leak

तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅपवर मोफत इंटरनेट डेटा देणारा हा मेसेज आला आहे का ? तर या मेसेजपासून सावध राहा. 1 हजार GB इंटरनेट डेटा मोफत देण्याचं आमिष दाखवणारा हा मेसेज बनावट आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅपवर मोफत इंटरनेट डेटा देणारा हा मेसेज आला आहे का ? तर या मेसेजपासून सावध राहा. 1 हजार GB इंटरनेट डेटा मोफत देण्याचं आमिष दाखवणारा हा मेसेज खोटा आहे.

व्हॉट्स अ‍ॅपला 10 वर्षं झाल्याच्या निमित्ताने व्हॉट्स अ‍ॅपतर्फे हा इंटरनेट डेटा मोफत दिला जाईल, अशी ऑफर देणारा हा मेसेज सगळीकडे फिरतो आहे पण हा एक मोठा घोटाळा आहे, असा इशारा सायबर सिक्युरिटी सेलने दिला आहे.

ESET या सायबर सिक्युरिटी सेलला व्हॉट्स अ‍ॅपच्या नावाने हा मेसेज आला पण ज्या URL वरून हा मेसेज आला ते व्हॉट्स अ‍ॅपचं अधिकृत डोमेन नाही, असं आता उघड झालं आहे.

कोणत्याही मोठ्या ब्रँडचं प्रमोशन करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एखाद्या वेगळ्या कंपनीकडे असेल तरीही त्या कंपनीची वेबसाइट अधिकृत आहे की नाही हे आधी तपासून पाहायला हवं नाहीतर फसगत होण्याची शक्यता जास्त आहे, असंही सायबर तज्ज्ञांनी म्हटलं आहे.अशा प्रकारे लिंक उघडून तुम्ही जर माहिती भरत राहिलात तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका आहे.

आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी

अशा आकर्षक ऑफर देऊन व्हॉट्स अ‍ॅप युजर्सचे क्लिक मिळवायचे आणि आपला रेव्हेन्यू वाढवायचा, असा या बनावट ऑफर देणाऱ्या वेबसाइटचा उद्देश असू शकतो. त्यामुळेच अमुक एक लिंक उघडा आणि ती कमीत कमी 30 लोकांना फॉरवर्ड करा अशा मेसेजना बळी पडू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अशी बनावट डोमेन वापरून या वेबसाइट्स आदिदास, नेस्टले, रोलेक्स अशा मोठ्या ब्रँड्सचंही प्रमोशन करत आहेत. 2017 मध्येही अशाच प्रकारे व्हॉट्स अ‍ॅपचं नाव वापरून फ्री इंटरनेट अ‍ॅक्सेसचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा व्हॉट्स अ‍ॅपच्या नावानेच असे मेसेज फिरत आहेत.

=================================================================================================

VIDEO: रस्ते, गावं पाण्याखाली; पुरामुळे हाहाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या