मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /बोगस Apps पासून सावधान! अन्यथा चुकवावी लागेल मोठी किंमत

बोगस Apps पासून सावधान! अन्यथा चुकवावी लागेल मोठी किंमत

बऱ्याचदा  Apps ची संपूर्ण माहिती न वाचताच डाऊणलोड केले जातात. पण हा हलगर्जी पणा कधी कधी मोठी किंमत मोजायला लावू शकतो.

बऱ्याचदा Apps ची संपूर्ण माहिती न वाचताच डाऊणलोड केले जातात. पण हा हलगर्जी पणा कधी कधी मोठी किंमत मोजायला लावू शकतो.

बऱ्याचदा Apps ची संपूर्ण माहिती न वाचताच डाऊणलोड केले जातात. पण हा हलगर्जी पणा कधी कधी मोठी किंमत मोजायला लावू शकतो.

आपल्या मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे Apps आपण डाऊणलोड (download) करतो. बऱ्याचदा त्या Apps ची संपूर्ण माहिती न वाचताच डाऊनलोड केले जातात. पण हा हलगर्जी पणा कधी कधी मोठी किंमत मोजायला लावू शकतो. अशाच एका बोगस Apps (fake app) मुळे अमेरिकेतील एका माणसाने आयुष्यभराची कमाई गमावली आहे. या व्यक्तीने बिटकॉइन (bitcoin) चे बॅलेन्स आणि ट्रान्झॅक्शन (transaction) ची माहिती देणारं ट्रेझर (trezor) शी मिळतं जुळतं एक App डाऊनलोड केल होतं. आणि त्यामुळे त्यांना त्यांची सगळी सेविंग्स गमवावी लागली आहे. यापासून सावधान राहण्याचे काही उपाय जाणून घ्या.

वॉशिंग्टन पोस्ट च्या अनुसार Phillipe Christodoulou  ने बिटकॉइन शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ट्रेजर चा क्लोन म्हणजेच हूबेहूब या App शी जुळणार दुसरं App डाऊणलोड केलं होतं. पण हे एक बोगस App होत त्या व्यक्तीनी आपल्या सगळ्या डिटेल्स देऊन App लॉगिन केलं होत. आणि त्यामुळे लॉगिन केल्या बरोबर संबधित व्यक्तीचे सगळे पैसे लंपास करण्यात आले. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 4.3 करोड़ रुपये इतकी होती. हे सगळे पैसे काही समजण्याच्या आतच गायब झाले होते.

अजबच! पासपोर्ट, व्हिसा नाही तर इथं राहण्यासाठी चक्क काढून टाकावा लागतो शरीरातील एक अवयव

नुकतीच गुगल (google) आणि Apple ने एक नवीन पॉलिसी आणली आहे, या पॉलिसीनुसार युझर कोणत्याही Apps ला त्यांची सगळी माहिती पोहोचवू शकणार नाहीत. अॅपलअनुसार हे एक क्रिप्टोकरंसी App (cryptocurrency app) नाही, तर क्रिप्टोग्राफ़ी App आहे. जे फ़ाइल्सला एन्क्रिप्ट करतं आणि पासवर्ड स्टोअर करतं. सबमिट केल्यानंतर ते एक क्रिप्टोकरेंसी App मध्ये बदलतं आणि Apple ही सगळी माहिती मिळवण्यात अयशस्वी ठरलं होते. तर Phillipe ने यासाठी संपूर्णपणे Apple ला जबाबदार धरलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार Apple ने असे बोगस Apps प्लेस्टोअर ठेवायला नव्हते पाहिजे. Apple आणि गूगल ने आता असे बोगस Apps हटवण्यासाठी नवीन पॉलिसी आणली आहे. पॉलिसीन नुसार कोणत्याही Apps ला आता युझरच्या फोनची माहिती घेता येणार नाही. त्यासाठी नवीन अपडेट्स आणले आहेत.

तुम्ही कोणत्याही बँकिग किंवा कोणतंही App डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती तसेच रिव्हू नक्की वाचा तसेच डेव्हलप करणाऱ्या कंपनीची देखिल माहिती घ्या आणि त्यानंतरच वापर सुरू करा.

First published:

Tags: Technology