TVवर कोणती चॅनल्स सर्वाधिक पाहतायत लोक? रिपोर्टमधून समोर आली 'ही' माहिती

TVवर कोणती चॅनल्स सर्वाधिक पाहतायत लोक? रिपोर्टमधून समोर आली 'ही' माहिती

BARC च्या ‘What India watched 2019’ च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार दरदिवशी प्रत्येक घरात 5 तास 11 मिनिटं टीव्ही पाहिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच एकाच वेळी 222 मिलियन लोक प्राइम टाइम टीव्ही पाहत असल्याची माहिती समोर आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : कोरोना व्हायरसमुळे लोक आता घरात बंदिस्त झाले आहेत. यामुळे आता घरी टीव्ही पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. एका रिपोर्टनुसार जगभरात या दिवसात डिजिटल आणि टीव्ही कंझम्पशन वाढलं आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलने (BARC) च्या ‘What India watched 2019’ च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार दरदिवशी प्रत्येक घरात 5 तास 11 मिनिटं टीव्ही पाहिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच एकाच वेळी 222 मिलियन लोक प्राइम टाइम टीव्ही पाहत असल्याची माहिती समोर आली.

Livemint ने दिलेल्या वृत्तानुसार, सरासरी एक प्रेक्षक दर दिवशी 3 तास 42 मिनिटं टीव्ही पाहतो. BARC इंडियाने 44 हजार घरांमधील 1 लाख 85 हजार पॅनेलमधून सॅम्पल गोळा केले. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार 80 टक्के टीव्ही कंटेंटला को व्यूव्हिंगच्या माध्यमातून पाहिलं गेलं आहे.

जवळपास 836 मिलियन व्यक्तींपर्यंत टीव्ही पोहोचली आहे. मिडियम रेकॉर्ड करत असताना दर आठवड्याला 914 बिलियन पाहण्यात आलेल्या मिनिटांची नोंद झाली आहे. जनरल एंटरटेनमेंट चॅनेल आणि चित्रपटांच्या अकाउंटला पाहणाऱ्यांची संख्या तीन चतुर्थांश इतकी आहे. जी हाउसफुल 4 इतकी आहे. 2019 मध्ये टीव्हीवर सर्वाधिक पाहिली गेलेला चित्रपट म्हणून हाउसफुल 4 ची ओळख आहे.

गेल्या 4 वर्षांत टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये झालेली वाढ ही प्रादेशिक भाषांमुळे झाली आहे. 2016 मध्ये भारतीय भाषांची वाढ 15 टक्क्यांहून 2019 मध्ये 23 टक्क्यांवर पोहोचली. इंग्रजी भाषेच्या चॅनेलमध्ये घसरण झाली आहे. आता स्पोर्ट कव्हरेज हिंदीशिवाय प्रादेशिक भाषांमध्येही सुरु झाल्यानं हा फरक पडला आहे. खेळाची चॅनेल्स पाहणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे.

हे वाचा : इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

स्पोर्ट कॅटेगरीमध्ये 2018 ला चॅनेल पाहणाऱ्यांच्या संख्येत 17 टक्के वाढ झाली. गेल्या चार वर्षांत टीव्हीवर जाहीरातींचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढलं आहे. यात हिंदीचा वाटा 33 टक्के इतका आहे. बातमी, GECs आणि चित्रपटांच्या चॅनेलची संख्या आजही जाहिरातींच्या तुलनेत तीन चतुर्थांश इतकी आहे.

हे वाचा : Jio चा डबल धमाका, 11 ते 101 रुपयांच्या प्लॅनवर टॉकटाइमसह मिळणार दुप्पट डेटा

लहान मुलांच्या टीव्ही बेसचा 20 टक्के इतका भाग हा इतर प्रेक्षकांचा आहे. मुलांच्या चॅनेल्सच्या प्रेक्षकांची संख्या एकूण प्रेक्षक संखेच्या 6 टक्के आहे. गेल्या चार वर्षांत टीव्हीवर जाहिरातींचे प्रमाण 21 टक्के वाढले आहे. 2019 मध्ये 11525 जाहीरातदारांनी 634 चॅनेल्सवर 76.8 मिलियन जाहीराती दिल्या. ज्या संपूर्ण भारतात 197 मिलियन घरांमध्ये पोहोचल्या. प्रोडक्ट आणि सर्विसेसमध्ये FMCG समुहांनी 2019 मध्ये जाहीरातींमध्ये 54 टक्के भाग व्यापला होता.

हे वाचा : Work From Home : इंटरनेट Disconnect होत असेल तर ऑफलाइन मोड सेटअपचा असा करा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Tv
First Published: Mar 21, 2020 09:26 PM IST

ताज्या बातम्या