मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Banking Fraud: ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब; अशी झाली पोलखोल

Banking Fraud: ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब; अशी झाली पोलखोल

शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  Karishma
रायगढ, 8 जुलै : शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून फसवणुकीच्या प्रकरणातून एटीएम कार्ड आणि 7 लाख 95 हजार 510 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. हा आरोपी सेवा सहकारी संस्थेत कामाला होता. या आरोपीला एटीएम कार्ड (ATM Card) वाटण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हिरालाल चौधरी नावाचे एक शेतकरी त्यांना पैशांची गरज असल्याने बँकेत पोहोचले. बँकेत पैसे काढण्यावेळी त्यांना बँक व्यवस्थापनाने त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचं सांगितलं. खात्यात पैसे नसल्याची (Bank Fraud) माहिती मिळताच ते हैराण झाले. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायगढ (Raigarh) येथे हा प्रकार उघडकीस आला. 4 जून रोजी शेतकरी हिरालाल चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, की अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून 5 लाख 45 हजार 510 रुपये काढले आहेत. या प्रकरणानंतर आणखी एका शेतकऱ्याने त्यांच्याही खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याची पोलीस तक्रार केली. त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने 2 लाख 50 हजार रुपये काढले होते.

(वाचा - Cyber Fraud:जेवण ऑर्डर केलं अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला सॉफ्टवेअर इंजिनियर)

पीडित शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज शोधले आणि संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासात आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत होता. त्याला शेतकऱ्यांना एटीएम वाटण्याची जबाबदारी होती. परंतु आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले. पोलिसांनी जवळपास 8 लाखांपर्यंतची रोख रक्कम जप्त करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
First published:

Tags: ATM, Financial fraud

पुढील बातम्या