मुंबई, 14 जानेवारी : स्कूटर म्हटल्यावर डोळ्यासमोर बजाजची गाडी डोळ्यासमोर येते. बजाजच्या प्रिया आणि चेतक या ब्रॅण्डने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही या गाड्यांचे चाहते आहेत. बाजारातून या स्कूटर हद्दपार झाल्या असल्या तरी लोकांच्या मनात मात्र अजुनही गाड्यांचे स्थान कायम आहे. 1972 ला सुरु करण्यात आलेल्या चेतक गाडीचे उत्पादन कंपनीने 2006 बंद केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा नव्याने कंपनीने कंपनीने चेतक ही इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे.
नव्या चेतक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. इलेक्ट्रीक चेतक स्कूटर बजाजने लाँच केली आहे. स्कूटरचे बूकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. बजाजची ही चेतक स्कूटर पुन्हा नव्या रुपात येणार आहे.
चेतकचे स्कूटर दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यात शहरी आणि प्रीमियमचे सहा व्हेरिअंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 95 किमीपर्यंत धावेल. तसेच स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी मिळणार आहे. तसेच फक्त 2 हजार रुपयांत याचे बूकिंग करता येणार आहे.
महिंद्राच्या Thar ला टक्कर देण्यासाठी येते फोर्सची नवी Gurkha, जाणून घ्या फिचर्स
बजाजचे चेतक इलेक्ट्रिक रेट्रो स्टायलिंग स्कूटर आहे. याचा लूक स्टायलिश आहे. यात सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरमध्ये एलईडी लाइट, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट देण्यात आले आहेत. स्कूटरच्या दोन्ही बाजूला 12 इंच अलॉय व्हिल्स आहेत. तसेच या स्कूटरमध्ये रिव्हर्स गिअरसुद्धा असणार आहे.
टीव्ही नाही आता SONY लाँच करणार इलेक्ट्रानिक कार, ऑटो इंडस्ट्रीमध्ये एंट्री मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.