मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /विद्यार्थ्याची कमाल! तयार केला देशातला सर्वात लहान आणि स्वस्त Fridge, जाणून घ्या फायदा

विद्यार्थ्याची कमाल! तयार केला देशातला सर्वात लहान आणि स्वस्त Fridge, जाणून घ्या फायदा

Photo Credit: Odisha Bytes

Photo Credit: Odisha Bytes

कमल किशोर माझी (amal Kishor Majhi) याने देशातला आतापर्यंतचा सर्वांत लहान फ्रीज बनवला आहे. यासाठी त्याचं नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्येही (India Book of Records) नोंदवलं गेलं आहे

    नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : काही काळापूर्वी फ्रीज ही चैनीची वस्तू समजली जात होती; पण आता फ्रीज (Fridge) ही घरातली गरजेची वस्तू झाली आहे. शहरात तर फ्रीज नसेल असं घर अपवादानेच आढळेल. ग्रामीण भागातही आता फ्रीजचा वापर सर्रास होत असल्याचं दिसून येतं. काहींच्या घरात मोठे फ्रीज असतात, तर काहींच्या घरात लहान. गाडीत ठेवता येईल असे फ्रीजही आहेत; पण आता देशातला सर्वांत लहान फ्रीज (Smallest Fridge) तयार केला गेला आहे.

    ओडिशाच्या (Odisha) भद्रक (Bhadrak) जिल्ह्यातल्या सालापूर (Salapur) भागात राहणारा कमल किशोर माझी (Amal Kishor Majhi) याने देशातला आतापर्यंतचा सर्वांत लहान फ्रीज बनवला आहे. यासाठी त्याचं नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्येही (India Book of Records) नोंदवलं गेलं आहे. कमल बीटेकच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने यापूर्वीही अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवल्या आहेत. त्याने बनवलेल्या देशातल्या या सर्वांत लहान फ्रीजबद्दल जाणून घेऊया. याबाबतचं वृत्त झी हिंदी न्यूजनं दिलं आहे.

    दररोज केवळ 50 रुपयांची बचत करुन व्हाल करोडपती, ही सोपी पद्धत पाहाच

    कमलने हा फ्रीज अॅल्युमिनियम शीट, ब्रशलेस कूलिंग फॅन, हीट सिंक, थर्मो-इलेक्ट्रिकल मॉडेल, सेफ्टी ग्रिल, 12 व्ही डीसी मोटर, सॉकेट्स आणि एलईडीचा वापर करून बनवला आहे. केवळ 12.7 सेमी लांब, 10.3 सेमी रुंद आणि 20.5 सेमी उंचीचा हा फ्रीज आहे. एवढा लहान फ्रीज बनवण्याची कल्पना कशी सुचली, याबाबत कमलला विचारलं असता त्याने सांगितलं की, कोविड काळात त्याला हा फ्रीज बनवण्याची कल्पना सुचली. लस, इंजेक्शन, औषधं आणि इतर वैद्यकीय वापरासाठी, तशा वस्तू साठवण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी फ्रीज आवश्यक आहे; पण हे फ्रीज खूप महाग असतात. त्यामुळे वैद्यकीय वस्तू इतर ठिकाणी नेण्यासाठी लहान आणि स्वस्त फ्रीज आवश्यक आहे असं वाटलं. आपल्यामधल्या सर्जनशीलतेला अधिक वाव देता येईल आणि आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवता येईल, असाही विचार करूनही फ्रीज बनवल्याचं कमलनं म्हटलं आहे.

    मुलाखतीला जाण्यासाठी पैसेही नव्हते, शेतमजुराचा मुलगा झाला क्लास वन अधिकारी!

    कमलचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. हा फ्रीज भारतातला सर्वांत लहान फ्रीज मानला जात आहे. यामुळेच कमल किशोर माझी याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. कमलने याआधी मिनी व्हॅक्यूम क्लीनर आणि फूट-यूज हँड सॅनिटायझर अशी काही उपकरणं बनवली आहेत. हा फ्रीज ही त्याची चौथी निर्मिती आहे.

    या फ्रीजचं दुसरं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, हा फ्रीज केवळ 1500 रुपयांमध्ये बनला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठीही हा फ्रीज उपयुक्त आहे. हा फ्रीज स्वस्त तर आहेच; पण तो एका साध्या बॅटरीवरही चालू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्यांनाही हा फ्रीज वापरणं सोपं होईल.

    First published:
    top videos

      Tags: Record, Technology, Viral news