मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

या चुकांमुळे स्मार्टफोनमध्ये लागू शकते आग, अशी घ्या काळजी

या चुकांमुळे स्मार्टफोनमध्ये लागू शकते आग, अशी घ्या काळजी

अधिकतर स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा त्याहून अधिकची बॅटरी असते. तसंच फास्ट चार्जिंगही असतं, त्यामुळे आपला फोन योग्यरित्या वापरणं गरजेचं आहे.

अधिकतर स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा त्याहून अधिकची बॅटरी असते. तसंच फास्ट चार्जिंगही असतं, त्यामुळे आपला फोन योग्यरित्या वापरणं गरजेचं आहे.

अधिकतर स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा त्याहून अधिकची बॅटरी असते. तसंच फास्ट चार्जिंगही असतं, त्यामुळे आपला फोन योग्यरित्या वापरणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : स्मार्टफोनमध्ये आग लागल्याने नुकतंच अमेरिकेत एक विमान रिकामं करावं लागलं होतं. स्मार्टफोनमध्ये आग लागण्याची शक्यता कमी असते परंतु ही शक्यता या गोष्टीवर ठरते की आपल्या फोनचा कसा वापर केला जातो. अधिकतर स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा त्याहून अधिकची बॅटरी असते. तसंच फास्ट चार्जिंगही असतं, त्यामुळे फोन योग्यरित्या वापरणं गरजेचं आहे. अधिकतर आग लागण्याच्या प्रकरणात स्मार्टफोन कंपन्यांनी युजर्सच्या चुकीचा दावा केला आहे. - जर स्मार्टफोन डॅमेज झाला, तर त्याचा वापर करू नये. लगेच सर्विस सेंटरमध्ये फोनची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तुटलेला डिस्प्ले किंवा बॉडी फ्रेम पाणी किंवा घामाने फोनची बॅटरी आणि इतर पार्ट्स खराब करू शकतात. डॅमेज फोनचा वापर करणं जोखमीचं ठरू शकतं. - फास्ट चार्जिंग एडॅप्टरचा वापर सावधतेने करणं गरजेचं आहे. तेच चार्जर वापरा जे फोनसोबत आलं आहे. डुप्लिकेट चार्जरचा वापर करू नका. - थर्ड पार्टी किंवा नकली बॅटरीचा वापर करू नका. फोनचा वापर करताना सुरक्षेसंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. खराब लिथियम-आर्यन, बॅटरी अधिक गरम करतात. त्यामुळे लवकर आग पकडू शकते. - चार्जर लावून फोन वापरणं टाळा. फोन वापरताना अधिक गरम झाल्यास तो काही वेळ बंद ठेवा.

फोनवर Screen Guard चा चुकीचा वापर ठरेल नुकसानकारक, ही चूक अजिबात करू नका

- ड्रायव्हिंग करताना पॉवर बँकचा वापर करा, कार चार्जिंग एडॅप्टरने चार्ज करताना पॉवर अचानक वाढू शकते, त्यामुळे फोनमध्ये आग लागू शकते. - फोन रात्रभर चार्जसाठी ठेवू नका. फोन 100 टक्केही चार्ज करू नका. 90 टक्के झाल्यानंतर बॅटरी चार्ज करणं बंद करणं फायद्याचं ठरतं. यामुळे बॅटरी लाईफ वाढतं. ओव्हरचार्जमुळे बॅटरी एक्सपँड होते, त्यामुळे फुटण्याचा धोका असतो. - फोन चार्ज करताना इतर कोणतीही हीट फोनवर येऊ नये. उन्हापासून किंवा इतर गरम गोष्टीपासून दूर चार्ज करा. - स्मार्टफोन नेहमी अधिकृत सर्विस सेंटरमध्ये दुरुस्त करा.
First published:

पुढील बातम्या