Hyundai Creta दमदार लूकमध्ये लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

Hyundai Creta दमदार लूकमध्ये लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

या कारची किंमत किती आहे आणि याचं वैशिष्ट्यं नेमकं काय आहे वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : ऑटोमोबाईल कंपनीमध्ये फिचर्स आणि आपल्या शानदार लूकसाठी प्रसिद्ध असलेली हुंडाई कंपनी( Hyundai)Creta कारची सेकंड जनरेशन लवकरच लाँच करणार आहे. दिल्लीत याचं मॉडेल एक इव्हेंटमध्ये दाखवलं जाणार असून मार्च महिन्यात भारतात ही गाडी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सेकंट जनरेशन क्रेटा कारमध्ये काय आहे खास?

हुंडाई कंपनीची क्रेटा कार चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच कारवर आधारित हे जनरेशन असेल. भारतात या कारसाठी काही खास फीचर्स जोडले जाणार आहेत. याशिवाय काही बदल केले जाणार आहेत. भारतात येणारी क्रेटा कार ही स्प्लिट हेड आणि टेल-लाइट सेटअप, स्क्वॉयर वील आर्चसोबत लाँच करण्यात येणार आहे.

या गाडीची किंमत 10 ते 15.72 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये डीझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिनवर चालणाऱ्या कार भारतात लाँच करण्यात येणार आहे. या कारला 3 इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल असं इंजिन असणार आहे.

क्रेटा मॉडेलचा परिणाम रेल्टॉस कारच्या विक्रीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर 2019मध्ये या कारची विक्री 12,854 यूनिट झाली होती. तिच डिसेंबर महिन्यात अवघ्या साडे चार हजारवर आल्यानं रेल्टॉसला याचा मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा-Jio, Vodafone च्या 98 रुपयांच्या प्लानमध्ये मिळतात 'हे' फायदे

हेही वाचा-फक्त 6 सेकंदात पकडते 100 किमी वेग, अशी आहे Audi Q8 ची किंमत आणि फीचर्स

हेही वाचा-आता चालताना एकटेपणा नाही जाणवणार उबेरनं आणला 'ही' नवी ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 09:31 PM IST

ताज्या बातम्या