• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • सिंगल चार्जिंगमध्ये 130 किलोमीटर प्रवास; बाजारात लवकर दाखल होणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

सिंगल चार्जिंगमध्ये 130 किलोमीटर प्रवास; बाजारात लवकर दाखल होणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

चीनमधील आटोमोबाईल कंपनी आता इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणत आहे. कंपनीनं नुकतीच आपलं 300NK बाईक इंजिन BS6 मध्ये अपडेट केलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 मार्च : चीनमधील ऑटोमोबाईल कंपनी CFMoto आता इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) बाजारात आणत आहे. कंपनीनं नुकतीच आपलं 300NK बाईक इंजिन BS6 मध्ये अपडेट केलं आहे. गतवर्षी याच कंपनीनं zeeho हा नवीन ब्रॅण्ड बाजारात लाँच केला होता. हा ब्रॅण्ड इलेक्ट्रीक दुचाकींची निर्मिती करतो. जिगव्हिल्सच्या वृत्तानुसार कंपनी लवकरच मार्केटमध्ये zeeho cyber इलेक्ट्रीक स्कूटर मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरचे डिझाईन Kiska Design द्वारे करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने 650cc trio ची निर्मिती पूर्ण केली असून लवकरच ती बाजारात लाँच करण्यात येणार आहे. दर 8 महिन्यांनी एक नवं इलेक्ट्रीक मॉडेल बाजार लाँच करण्याचं CFMoto चं उद्दिष्ट आहे. CFMoto च्या इलेक्ट्रीक स्कूटरचा लूक कंपनीने या स्कूटरचे कन्सेप्ट मॉडेल फ्युचरिस्टीक डिझाईन (Futuristic Design) केलं आहे. परंतु प्रोडक्शन मॉडेल हे या कन्सेप्ट मॉडेलपेक्षा वेगळं असेल असं जाणकारांचं मत आहे. या मॉडेलचा समोरील लूक स्पोर्टी आणि मस्क्युलर आहे. या स्कूटरचे सीट लहान ठेवण्यात आलं असलं तर त्यावर बसून 2 लोक सहज प्रवास करू शकतील. CFMoto च्या इलेक्ट्रीक स्कूटरचा परफॉर्मन्स कंपनीने या स्कूटरमध्ये 13.4bhp पॉवरची इलेक्ट्रॉनिक मोटार (Electronic Motor) दिली आहे. ही मोटार 213 Nmची पीक टॉर्क जनरेट करू शकणार आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 210 Kmph असेल. ही स्कूटर 3 सेकंदात 0 ते 50 किलोमीटरचा वेग पकडू शकते. CFMoto च्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज कंपनीने या स्कूटरमध्ये फेरोसिस ऊर्जेद्वारे तयार केलेल्या 4kw क्षमतेच्या लिथीयम बॅटरीचा (Lithium Battery) वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 130 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या बॅटरीची लाईफ 8 वर्षे किंवा 3 लाख किलोमीटरपर्यंत असेल, असा दावा कंपनीनं केला आहे. ही बॅटरी वेगात म्हणजेच 30 मिनिटांत 80 टक्के चार्जिंग होते. ही बॅटरी -20 अंश ते 55 अंश सेल्सिअस अशा कोणत्याही तापमानात चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. यामुळे ही स्कूटर कोणत्याही देशात चांगला परफॉर्मन्स देऊ शकणार आहे. (हे वाचा:शेतकऱ्याची कमाल! लॉकडाउन काळात बनवली Electric Car) CFMoto च्या इलेक्ट्रीक स्कूटरचे फिचर्स कंपनीने या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये इको, स्ट्रीट आणि स्पोर्टस असे 3 ड्रायव्हिंग मोडस (Driving Modes) दिले आहेत. भारतीय मार्केटमध्ये येणारे या स्कूटरचे मॉडेल हे ग्लोबल मॉडेलपेक्षा वेगळे असेल, असे कंपनीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. या स्कूटरसह इलेक्ट्रीक बाईक्स देखील बाजारात आणण्याचं या कंपनीचं नियोजन आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती कंपनीकडून दिली जाणार आहे. भारतीय बाजारात या मॉडेलची थेट स्पर्धा Ather 450x आणि भारतीय ब्रॅण्ड कबीराच्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत असेल.
First published: