Xiaomiची इलेक्ट्रीक बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomiची इलेक्ट्रीक बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Himo T1 या मॉडेलमध्ये LED हेडलाइट आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट कलस्टरसारख्या अनेक फीचर्सचा लाभ घेता येणार.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर: स्मार्टफोन, टीव्हीच्या मिळालेल्या यशानंतर आता Xiaomi ऑटोमध्येही स्पर्धेसाठी उतरलं आहे. Xiaomi कंपनीने इलेक्ट्रीक बाइक लाँच केली आहे. Himo T1  असं या ई-बाइकचं नाव आहे. मोबाईल आणि टीव्हीमध्ये मिळालेल्या भरगोस यशानंतर आता शाओमी कंपनी कंपनीने ई-बाइकच्या सेममेंटमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. ही बाईक लाँच करण्यात आली असून भारतात त्याची किंमत 31 हजार रुपये आहे. ही बाइक दिसायला सायकलसारखी असली तरीही ह्या बाइकमध्ये पॅडलसोबत मोटरही देण्यात आली आहे. त्यामुळे सायकल ऐवजी याला ई-बाइक असं म्हटलं जात आहे.

Xiaomi कंपनीने लाँच केलेल्या ई-बाइकचे काय आहेत फिचर्स

Himo T1 या बाइकची किंमत 31 हजार रुपये आहे. यामध्ये तुम्हाला LED हेडलाइट  आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसारखे अॅडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. डिजिटल क्लस्टरद्वारे तुम्हाला ई-बाइकचं बॅटरी पर्सेंटेज, सीड, टाइम आणि इतर माहिती मिळू शकते. कंपनीकडून Himo T1 इ-बाइकसाठी 14,000mAh Li-ion बॅटरी दिली आहे. 14 Ah वर्जन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर साधारण 60 किलोमीटरपर्यंत ही बाइक चालू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये 28Ah असलेलं मॉडेल निवडण्याचा पर्याय तुम्हाला मिळेलं. 28Ah असलेली बाटरी साधारण एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर मायलेज देण्याची ताकद यामध्ये आहे. त्यामुळे 14 Ah पेक्षा हा पर्याय निवडला तर दुप्पट फायदा मिळू शकतो.

वाचा-मोबाइल रिचार्ज महागले तरी सरकार म्हणते स्वस्तच!

शाओमी कंपनीने या बाइकमध्ये पुढच्या बाजुला सस्पेंशन फॉर्क दिला आहे. त्यासोबतच डुएल कॉयल-ओवर सस्पेंशनचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे. य़ा बाइकच्या मॉडेलला पुढे हाइड्रॉलिक डिस्क ब्रेक मिळतात मात्र प्रत्यक्षात कंपनीने ड्रम ब्रेक्स दिले आहेत. त्याचा सर्वाधिक वेग किती असेल याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती मिळू शकली नाही. Himo T1 या मॉडेलमध्ये ग्राहकांना तीन रंग मिळू शकणार आहेत. लाल, राखाडी आणि पांढरा अशा तीन रंगात ही ई-बाईक ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

 

Published by: Kranti Kanetkar
First published: December 7, 2019, 9:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading