मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

दुचाकी घेणाऱ्यांसाठी खूशखबर! Heroची बाईक झाली 8000 रुपयांनी स्वस्त

दुचाकी घेणाऱ्यांसाठी खूशखबर! Heroची बाईक झाली 8000 रुपयांनी स्वस्त

बाईक घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 31 जानेवारीपर्यंतच घेता येणार ऑफरला लाभ.

बाईक घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 31 जानेवारीपर्यंतच घेता येणार ऑफरला लाभ.

बाईक घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 31 जानेवारीपर्यंतच घेता येणार ऑफरला लाभ.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 17 जानेवारी: देशातील सर्वाधीक दुचाकी वाहनं विकली जाणारी कंपनी म्हणजे हीरो(hero). हीरो मोटोकॉर्पने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ही ऑफऱ फक्त जानेवारीपर्यंत असेल अशी माहिती देण्यात आलीय. त्याअंतर्गत कंपनी आपल्या बाईकच्या BS 4 व्हेरिएंटवर फायदे देत आहे. एप्रिलपासून BS 6 एमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर स्टॉक क्लिअर करण्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यामध्ये हीरोच्या बाईक्सवर कंपनी कॅशबॅक ऑफर्स देत आहे. तुम्ही EMI वर बाईक घेत असाल तर तुम्हाला 6.99 टक्के व्याजदर भरावा लागणार आहे. BS6 मॉडेलची किंमत BS4 पेक्षा 8 हजार रुपयांनी जास्त असणार आहे. तर BS 4 मॉडेल 8 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. ही ऑफरचा लाभ ग्राहकांना केवळ 31 जानेवारीपर्यंत घेता येणार आहे. या मॉडेल्सची सुरू आहे विक्री हीरो कंपनीचे सध्या भारतात Xpulse 200, Xpulse 200T, Xtreme 200S, Xtreme 200R, Karizma ZMR, Xtreme Sports, Achiever 150, Glamour, Super Splendor IBS, New Super Splendor IBS, Passion, Splendor iSmart+ IBS, HF Deluxe IBS i3S या बाईकचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. तर स्कुटरमध्ये Destini 125, Duet, Maestro Edge, Maestro Edge 125, Pleasure, Pleasure+ या मॉडेल्सचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जरी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली बाईक या ऑफरमध्ये मिळू शकते. हेही वाचा-कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच हेही वाचा-'मोटर वाहन कायदा 2019' राज्यात कधी लागू होणार? उल्लंघन केल्यास अशी आहे शिक्षा हेही वाचा-कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे 15 कडक नियम
First published:

Tags: Auto news, Hero, Hero motocorp, Techonology

पुढील बातम्या