बंपर धमाका! Audiच्या या कारवर मिळत आहे तब्बल 6 लाखांपर्यंत सूट

ऑडी क्यू 5 (Audi Q5)आणि Audi Q7 कारच्या मधली सिरिज लाँच, ऑडी क्यू 3वर मिळतेय 6 लाखांची सूट

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 10:27 AM IST

बंपर धमाका! Audiच्या या कारवर मिळत आहे तब्बल 6 लाखांपर्यंत सूट

मुंबई, 03 नोव्हेंबर: तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि त्यातही तुम्हाला ऑडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी खास ऑफर ऑडीनं आणली आहे. ऑडीच्या फॅन्ससाठी कायमच छान ऑफर्स घेऊन येते मात्र यावेळी आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळे गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. ऑडी कंपनीने एसयूवी क्यू 5, क्यू 7 या दोन मॉडेल्सवर लिमिटेड कालावधीसाठी ऑफर दिली आहे. Audi Q5 या कारची किंमत शोरुममध्ये 49.99 लाख रुपये आहे तर Audi Q7 कारची किंमत 68.99 लाख आहे. या दोन्ही मॉडेल्सवर कंपनीकडून 6 लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

फायनांशियल एक्सप्रेसने दिलेल्या अहवालानुसार 6 लाखांची सूट ही मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. याचा लाभ ग्राहकांना जवळच्या ऑडी इंडिया डीलरशिपसोबत संपर्क करुन घेता येईल. अशी माहिती

ऑडी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2009 साली लाँच केलेल्या या दोन्ही कारच्या मॉडेल्सनी लोकांची मनं जिंकली आहेत. दोन्ही मॉडेल्स लोकप्रिय आहेत. त्यांनी भारतामध्ये एक दशक पूर्ण केलं आहे. त्यामुळेच ग्राहकांसाठी ही खास ऑफर ऑडी कंपनीने दिली असल्याचं अधिकारी बलवीर सिंह ढिल्लन यांनी सांगितलं.

ऑडी क्यू 5 मॉडेलमध्ये पेट्रोल व डीज़ल दोन्ही वॉरेंटीमध्ये उपलब्ध आहेत. क्यू 5 पेट्रोल असणाऱ्या कारला 2.0L TFSI इंजन लावण्यात आलं आहे. त्यामुळे 252 एचपी आणि 370 एनएम टार्क जेनरेट होतो. 237 किमी प्रतितास वेगाने ही गाडी धावते. 0 ते 100 किमीपर्यंत ह्या गाडीला स्पीड देण्यात आला आहे.

यावेळी एप्रिलमध्ये ऑडी क्यू 7चं लाईफस्टाइल एडीशन लाँच केलं होतं. त्या कारच्या मॉडेलची किंमच साधारण 75,82,100 रुपए  आहे. यामध्ये रियर सीट इंटरटेनमेंट सिस्टम, एस्प्रेसो मोबिल, एंट्री एलईडी लाइट्स आणि साइड रनिंग बोर्डसारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये ऑडी कंपनीने क्यू 7 ब्लॅक मॉडेलचं एडिशन काढलं होतं. त्याची किंमत जवळपास 83 लाखांपर्यंत होती. तुम्ही जर ऑडी कार घेण्याचा विचार करत असाल तर जवळच्या ऑडी सेंटरमध्ये जाऊन त्वरित या ऑफरचा लाभ घ्या आणि संबंधित माहिती विचारायला विसरु नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...