कमी किमतीत जास्त मायलेज देणारी honda Activa 6G लाँच

कमी किमतीत जास्त मायलेज देणारी honda Activa 6G लाँच

hondaची दमदार दुचाकी लाँच, नव्या Activa 6G गाडीचे जाणून घ्या फीचर्स

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी: देशात सगळ्यात जास्त होंडा (honda) कंपनीच्य़ा अॅक्टीवा (Activa) दुचाकी ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. आता कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी Activa 6G दुचाकी होंडा कंपनीकडून नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या दुचाकीमध्ये ग्राहकांना दोन वेरियंट उपलब्ध असणार आहेत. स्टँडर्ड Activa 6G दुचाकीची शोरूममधली किंमत 63,912 रुपये तर डीलक्स Activa 6G दुचाकीची शोरूममधील किंमत 65,412 रुपये आहे. BS-4 Activaच्या तुलनेमध्ये नवीन आलेली BS-6 (activa 6G) नव्या रुपात आणि जास्त फिचर्ससह बाजारात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

Honda Activa 6G- 109.19 cc सोबत सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनची पावर 7.7bhp आणि 8.79Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. पावरबाबत विचार करायचा झाल्यास BS-4 पेक्षा हे मॉडेल 0.3bhpने कमी आहे. यासोबत फ्युअल टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

मायलेजच्या बाबतीत ही दुचाकी आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक सरस आहे. नव्या Activa 6G जुन्य़ा मॉडेलपेक्षा 10 पट जास्त फ्युअल एफिशियंट असल्यानं जास्त स्मूथ चालते असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ही गाडी तुम्हाला 6 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. (blue, red, grey, black, yellow आणि white) असे 6 रंग उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ही गाडी हव्या त्या रंगात शोरूममध्ये अथवा जवळच्या सेंटरमध्ये उपलब्ध होऊ शकते.

हेही वाचा-बजाजची 'चेतक' 14 वर्षांनी नव्या रुपात धावणार, अशी आहेत फीचर्स आणि किंमत

या मॉडेलमध्ये इसमें एसीजी साइलेंट स्टार्टर मोटर, फ्यूअल इंजेक्शन, टेलिस्कोपिक सस्पेंशन, एक्सटर्नल फ्यूअल कॅप, नवीन ईएसपी टेक्नॉलजी, ड्य़ुअल फंक्शन स्विच, मल्टीफंक्शनल स्विच गियर यासारखे अनेक नवीन आणि अद्ययावत फिचर्स देण्यात आली आहेत. या दुचाकीचं बुकींग साधारण 1 फेब्रुवारी 2020 पासून सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा-Royal Enfield ची नवी Himalyan लवकरच होणार लाँच, असा असेल लूक आणि फीचर्स

हेही वाचा-ड्रोनने कॅमेरा उडवण्याआधी 'हे' करा नाहीतर होऊ शकते अटक, केंद्राने दिले नवे आदेश

Published by: Kranti Kanetkar
First published: January 15, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading