मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Mahindra Funster अशी इलेक्ट्रिक कार तुम्ही कधीच पाहिली नसणार; शानदार कारचा लाँचिंग VIDEO

Mahindra Funster अशी इलेक्ट्रिक कार तुम्ही कधीच पाहिली नसणार; शानदार कारचा लाँचिंग VIDEO

सध्या Mahindra Funster सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पाहा शानदार कारचा लाँचिंग VIDEO

सध्या Mahindra Funster सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पाहा शानदार कारचा लाँचिंग VIDEO

सध्या Mahindra Funster सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पाहा शानदार कारचा लाँचिंग VIDEO

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: ‘ऑटो एक्सपो 2020’ (Auto Expo 2020) मध्ये महिंद्राने (Mahindra) आपली सर्वात आकर्षक इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. देश-विदेशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या नवीन कार ऑटो एक्सपोमध्ये आणल्या आहेत. इतकंच नाही तर, आपल्या फ्यूचर कार आणि फ्यूचर टॅक्नोलॉजीही सर्वांसमोर आणत आहेत. सध्या Mahindra Funster सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यासोबत टाटा (TATA), ह्युंदाई (Hyundai), रेनॉ (Renault), किआ मोटर्स (Kia Motors), एमजी मोटर (MG Motor) या कंपन्याही आपल्या नवीन कार आणि कॉन्सेप्ट कार समोर आणत आहेत.

Mahindra Funster कॉन्सेप्ट डिझाइन कार आहे. ही कार XUV500 ची झलक असून त्याहून आकर्षकरीत्या डिझाइन करण्यात आली आहे. डिझाइनबद्दल सांगायचं झालं तर, फ्रंटला L आकाराची एलईडी हॅडलँप क्लस्टर लावण्यात आलं असून मध्यभागी ग्रील देण्यात आलं आहे. तसेच, फ्रंट ग्रील लोगोसोबत चमकताना दिसत आहे. इतकच नाही तर, अलॉय व्हील ब्लॅक कलरमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारमधील बटरफ्लाय सारखी ओपन होणारी विंडो कारला आणखी आकर्षक लुक देत आहे. विशेष म्हणजे, Mahindra Funster केवळ 5 सेकंदामध्ये 0 पासून 100 किमी/प्रति तास वेग घेते. आकर्षक दिसणारी Mahindra Funster सर्वांनाच भुरळ पाडत असल्याचं दिसत आहे.

‘ऑटो एक्सपो 2020’ (Auto Expo 2020) मध्ये ‘महिंद्रा’ने Mahindra Funsterचा उल्लेख शोस्टॉपर म्हणून केला आहे.

संबंधित

Auto Expo 2020 : TATA ‘Sierra’ची झलक पाहून थक्क व्हाल! पाहा नेमकी कशी आहे ही कार

Auto Expo 2020 : Mahindraची सर्वात स्वस्त eKUV100 इलेक्ट्रिक कार लाँच!

First published:

Tags: Car