विक्रमी विक्री; mercedes benz ने नवरात्रीच्या दिवसांत विकल्या तब्बल इतक्या गाड्या

विक्रमी विक्री; mercedes benz ने नवरात्रीच्या दिवसांत विकल्या तब्बल इतक्या गाड्या

2019 मध्ये याच कालावधीत झालेल्या विक्रमी विक्रीची, पुनरावृत्ती करत या लक्झरी ब्रँडने या वर्षी देशभरातील 550 ग्राहकांना कार वितरित केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने (mercedes-benz) नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विक्रमी ग्राहक वितरण आकडे जाहीर केले आहेत. 2019 मध्ये याच कालावधीत झालेल्या विक्रमी विक्रीची, पुनरावृत्ती करत या लक्झरी ब्रँडने या वर्षी देशभरातील 550 ग्राहकांना कार वितरित केल्या आहेत. दिल्ली एनसीआर, मुंबई आणि गुजरातसारख्या प्रमुख बाजारांमध्ये गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहकांच्या मागणीत वाढ झाली आहे.

दिल्ली एनसीआर, मुंबई, गुजरात आणि उत्तर भारतातील अन्य बाजारपेठांतून 550 ग्राहकांनी गाड्यांची खरेदी केली आहे. एकट्या दिल्ली एनसीआरमध्ये 175 नवीन मर्सिडीज-बेंझ कारची विक्री झाली आहे. कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या सध्याच्या बाजाराच्या आव्हानांमध्येही मर्सिडीज-बेंझ Q3 च्या 2020 मध्ये मासिक विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे.

'या' इलेक्ट्रिक स्कूटर देतील सिंगल चार्जमध्ये जबरदस्त मायलेज; जाणून घ्या किंमत

मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क (Martin Schwenk) यांनी सांगितलं की, या वर्षीचा सणासुदीला जोरदार सुरुवात झाली आहे आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या या सकारात्मक प्रतिक्रियेचा आम्हाला आनंद आहे. आता मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने आगामी सणांच्या काळात आणि पुढेही चांगली विक्री होईल असा विश्वास आहे. मर्सिडीज-बेंझ ब्रँड आणि उत्पादनांवर लक्झरी कार खरेदीदारांचा विश्वास असल्याने आणि आजच्या बाजाराच्या आव्हानात्मक परिस्थितीतही अशी विक्री झाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आसल्याचं, ते म्हणाले.

Diwali Offers: Suzukiच्या 'या' वाहनांवर आकर्षक ऑफर; स्विफ्ट जिंकण्याची संधी

ग्राहकांच्या गरजा ऐकून, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊनच नियोजन केलं जातं. आमच्या ग्राहक केंद्रित धोरणामुळेच, आमच्या ब्रँडला सकारात्मक गती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. या उत्सवाच्या कालावधीत आणि पुढील तिमाहीतही गती वाढवण्याचा विश्वास आहे. येत्या तिमाहीत आम्ही काही नवीन उत्पादन बाजारात आणण्याच्या तयारीत असून, उर्वरित वर्षात विक्री वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील, मार्टिन श्वेन्क यांनी सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: October 28, 2020, 12:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या