मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फक्त 6 सेकंदात पकडते 100 किमी वेग, अशी आहे Audi Q8 ची किंमत आणि फीचर्स

फक्त 6 सेकंदात पकडते 100 किमी वेग, अशी आहे Audi Q8 ची किंमत आणि फीचर्स

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑडी क्यू8 ही कार विकत घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑडी क्यू8 ही कार विकत घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑडी क्यू8 ही कार विकत घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

    अलिशान कारची निर्मिती करणारी कंपनी ऑडीने नवी ऑडी क्यू 8 ही कार लाँच केली आहे. गाडीच्या लाँचिंगनंतर विराटने ती गाडी 24 तासांच्या आत खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. तसंच ही कार खरेदी करणारा तो भारतातील पहिली व्यक्ती आहे. कंपनीने SUV Audi Q8 कार भारतात 1.33 कोटी रुपये इतक्या किंमतीत लाँच केली आहे. एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असलेल्या या कारमध्ये पेट्रोलचा पर्याय असून SUV Q7 पेक्षा वरच्या क्लासमध्ये कारचा नंबर लागतो. कस्टमायझेशन पर्यायासह 57 एक्सटीरिअर कलर ऑप्शन, 11 इंटिरियर ट्रिम्स आणि 9 वूडन पर्याय उपलब्ध आहेत. या लक्झरी कारमध्ये HD matrix LED सह 3D LED DRLs देण्यात आले आहेत. याशिवाय सिंगल फ्रेम octagonal ग्रिलसुद्धा आहे. कारची चाकेही मोठी असून 20 ते 21 इंच अलॉय व्हिलचा पर्यायही उपलब्ध आहे. कारच्या रिअर टेललाइटला जोडणारी एक लाइट स्ट्रिप देण्यात आली आहे. दुचाकी घेणाऱ्यांसाठी खूशखबर! Heroची बाईक झाली 8000 रुपयांनी स्वस्त Audi Q8 चे इंटिरिअर जबरदस्त असून यामध्ये कस्टमाइज contour सीट्स, क्वाड-झोन क्लायमेट कंट्रोल, 10.1 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, हिटिंग आणि एअर कंडिशनची माहिती देणारा 8.6 इंचाचा डिस्प्ले. आणि 12.3 इंच ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट यासारखी अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आली आहेत. Royal Enfield ची नवी Himalyan लवकरच होणार लाँच, असा असेल लूक आणि फीचर्स कारची क्षमतासुद्धा इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त आहे. BS-6 कार असणाऱ्या क्यू8 मध्ये 3.0 लिटर TFSI पेट्रोल इंजिन आहे. याची क्षमता 344PS असून 500Nm टॉर्क जनरेट होतो. ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 6 सेकंदात गाठते. तसेच 250 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. बजाजची 'चेतक' 14 वर्षांनी नव्या रुपात धावणार, अशी आहेत फीचर्स आणि किंमत
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Audi

    पुढील बातम्या