मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp च्या या सेटिंग्सचा वापर करताना सावधान, अन्यथा...

WhatsApp च्या या सेटिंग्सचा वापर करताना सावधान, अन्यथा...

आता त्याच फोन नंबरसमोर व्हॉट्सअ‍ॅप पेज दिसेल आणि मेसेज करण्यासाठी हिरव्या रंगाचं बटण दिसेल.

आता त्याच फोन नंबरसमोर व्हॉट्सअ‍ॅप पेज दिसेल आणि मेसेज करण्यासाठी हिरव्या रंगाचं बटण दिसेल.

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु यावर काही सेटिंग्स अशा आहेत, ज्या तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात.

नवी दिल्ली, 14 जून : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु यावर काही सेटिंग्स अशा आहेत, ज्या तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. फोन हॅक (Smartphone Hack) होण्याची भीती असू शकते.

Disappearing messages -

व्हॉट्सअ‍ॅपने Disappearing messages हे नवं फीचर रोलआउट केलं. या फीचरमुळे तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रायव्हसीच्या हिशोबाने हे फीचर धोकादायक ठरू शकतं. आपोआप डिलीट होणारे मेसेज कमीत-कमी 7 दिवसांपर्यंत राहतात. तोपर्यंत मेसेज नोटिफिकेशनमध्ये राहतात. हे चॅट्स दुसरा युजर कॅप्चर करू शकतो. तसंच रिसिव्ह करणारा युजर मेसेजचा बॅकअप ठेऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने चॅट डिलीट करणं फायद्याचं ठरतं.

Default Saved Images -

जर तुमच्या फोनमध्ये येणारे फोटो किंवा व्हिडीओ आपोआप सेव्ह होत असतील, तर ही सेटिंग लगेच बदला. सायबर एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोज अनेकदा ट्रोजन हॉर्सप्रमाणे काम करतात. याच्या मदतीने हॅकर्स तुमचा फोन सहजपणे हॅक करू शकतात. यापासून वाचण्यासाठी WhatsApp सेटिंगमध्ये चॅट्सवर क्लिक करुन Save to Camera Roll बंद करा.

(वाचा - हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण)

WhatsApp Backup -

Apple ची सिक्योरिटी सर्वात मजबूत समजली होते. परंतु व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकअप iCloud मध्ये घेऊ नये, असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. कोणतंही व्हॉट्सअ‍ॅप चॅट iCloud मध्ये गेल्यानंतर Apple ची प्रॉपर्टी होते. iCloud मध्ये पोहोचल्यानंतर तुमचं चॅट डिक्रिप्टेड (decrypted) होतं. म्हणजेच सुरक्षा एजेन्सी तुमचं चॅट Apple कडून घेऊ शकतात. त्यामुळेच एक्सपर्ट्सकडून iCloud मध्ये बॅकअप न घेण्याचा सांगितलं जातं.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News