Cyber Fraud: बँक खात्यावर चोरट्यांचा डल्ला; टेन्शन घेऊ नका, असे परत मिळतील पैसे
Cyber Fraud: बँक खात्यावर चोरट्यांचा डल्ला; टेन्शन घेऊ नका, असे परत मिळतील पैसे
लोकांना फायनेंशियल फ्रॉडच्या केसेसमध्ये मदत करण्यासाठी आणि त्यांची चोरी झालेली रक्कम परत करण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये 12615 लोक असणार आहेत.
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : अनेकदा डेबिट कार्ड किंवा एटीएम आपल्या जवळच असतं, पण बँक खात्यातून पैसे काढले जातात, चोरी केले जातात. क्रेडिट कार्ड आपल्याकडेच असतानाही (Credit Card), सायबर क्रिमिनल (Cyber Fraud) त्यातून शॉपिंगही करतात. अशाप्रकारे झालेल्या फ्रॉडबाबत तेव्हाच समजतं, ज्यावेळी आपल्या मोबाईलवर या ट्रान्झेक्शनबाबत (Mobile Transitions) मेसेज येतो. पण आता अशाप्रकारे फ्रॉडद्वारे चोरीला गेलेले पैसे परत मिळणार आहेत.
सरकारने अशाप्रकारे सायबर फायनेंशियल फ्रॉडमध्ये चोरी झालेली रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी एक्सपर्ट्ची एक टीम तयार केली आहे. या टीमला सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट असं बोललं जाईल. या टीमच्या मदतीसाठी देशभरात लॅबोरेट्री बनवण्याचं काम सुरू आहे.
12615 लोकांच्या टीममध्ये तीन प्रकारचे एक्सपर्ट असणार -
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोकांना फायनेंशियल फ्रॉडच्या केसेसमध्ये मदत करण्यासाठी आणि त्यांची चोरी झालेली रक्कम परत करण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये 12615 लोक असणार आहेत. पोलीस, सरकारी वकील आणि ज्युडिशियल सर्व्हिसशी संबंधीत लोकांना या टीममध्ये सामिल करण्यात आलं आहे.
हे सर्व लोक देशातील विविध भागातील आहेत. विशेषत: या टीममधील लोक सायबर फायनेंशियल फ्रॉडमधील पीडितांना मदत करतील, परंतु त्यासोबतच महिला आणि मुलांच्या विरोधात होणाऱ्या सायबर क्राईममध्येही पीडितांची मदत करतील.
घरबसल्या फ्रॉडची तक्रार करण्यासाठी पोर्टल -
सायबर फायनेंशियल फ्रॉडबाबत तक्रार करण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. सायबर क्राईम या नावाने बनलेल्या पोर्टलवर तक्रार दाखल करता येणार आहे. एकदा तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकारी, स्वत: तक्रारदाराला संपर्क करेल. अशाचप्रकारे, महिला आणि लहान मुलांविरोधात होणाऱ्या सायबर क्राईमची तक्रार करता येईल. विशेष केसमध्ये तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.