Home /News /technology /

एकदा चार्ज करा आणि 21 तास वापरा; Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप

एकदा चार्ज करा आणि 21 तास वापरा; Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप

आसुस (Asus)ने भारतामध्ये 4 नवे लॅपटॉप लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, यातल्या काही लॅपटॉपची बॅटरी तब्बल 21 तासापर्यंत चालते.

    मुंबई, 10 नोव्हेंबर: तैवानची प्रसिद्ध कंपनी 'आसूस' सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आली आहे. या कंपनीने मंगळवारी भारतामध्ये 4 नवे लॅपटॉप लाँच केले. हे लॅपटॉप झेनबुक (Zenbook) आणि विवोबुक (Vivobook) सीरिजमधले आहेत. या लॅपटॉपच्या किंमती 42,990 पासून सुरू होतात. या सीरिजमधला सर्वात महाग लॅपटॉप 82,990 रुपयांचा आहे. Asus Zenbook 14 (UX425) ची किंमत 82,990 आहे. तर Asus VivoBook Ultra 14 (X413) ची किंमत 59,990 रूपये आहे. तसंच VivoBook Ultra K15 (K513) ची किंमत 42,990 रुपये आहे.  आणि VivoBook Ultra 15 (X513) हा लॅपटॉप  43,990 रुपयांना उपलब्ध आहे. नव्या तंत्रज्ञानाने बनवलेले हे लॅपटॉप तुमच्या वैयक्तिक आणि ऑफिसच्या कामासाठी, कॉलेजमधील प्रोजेक्टसाठीही उपयुक्त ठरू शकतात. या लॅपटॉपमध्ये गेम्ससाठी विशेष पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. या चारही लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप अतिशय दमदार आहे. या लॅपटॉपमध्ये Intel चा लेटेस्ट 11th जेनरेशन प्रोसेसर बसवण्यात आला आहे. अल्ट्रा स्लिम लॅपटॉपमुळे याला कमाल लूक येतो. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताच्या घडीच्या लॅपटॉपच्या तोडीस तोड परफॉर्मन्स आसूसच्या नव्या लॅपटॉपमध्ये मिळतो. Asus ZenBook 14 UX425 मध्ये काय आहे खास? या लॅपटॉपचं सर्वात सर्वात महत्वाचं वैशिष्ठ्यं म्हणजे बॅटरी बॅकअप. कंपनीचा दावा आहे की या लॅपटॉपला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 21 तास हा लॅपटॉप चालतो. याचं वजन 1.13 किलोग्रॅम आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 14 इंच  NanoEdge Full HD IPS LEDचा आहे. Asus ZenBook 14 हा लॅपटॉप Intel Core i5 आणि Core i7 अशा दोन्ही वेरियंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 16 GB चा RAM आणि 512 GB ची हार्ड डिस्क बसवण्यात आली आहे. Asus VivoBook Ultra K15ची वैशिष्ठ्यं Intel Core i3, Core i5 आणि Core i7 अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा Full HD LED backlit डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच लॅपटॉपला 8 GB RAM आणि 512 GB, एन टीबी स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. Asus VivoBook Ultra 14 X413 आणि 15 X513मध्ये काय विशेष ? मिड रेंजच्या युझर्ससाठी आसुसने VivoBook Ultra 14 X413 आणि 15 X513 असे 2 लॅपटॉप लाँच केले आहेत. यापैकी VivoBook Ultra 14 X413 Intel Core i5-1135G7 प्रोसेसर देण्यात आला आहे. याची स्क्रीन 14 इंच आहे. तर Asus VivoBook Ultra 15 X513 ला Intel Core i3, Core i5 आणि Core i7 अशा तीन व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आलं आहे. याची स्क्रीन 15.6 इंच आहे. या लॅपटॉपमध्ये 8GB RAMच्या बरोबर 512 GB इतक्या मोठ्या स्टोअरेजमध्येही लाँच करण्यात आलं आहे. तुम्हाला हे लॅपटॉप विकत घ्यायचे असल्यास फ्लिपकार्ट, टाटा क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांमध्ये उपलब्धआहेत. आसुसच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही तुम्ही लॅपटॉप विकत घेऊ शकता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या