Home /News /technology /

'कृत्रिम बुद्धिमत्तेत भारत करणार जगाचं नेतृत्व; आपल्याकडचा प्रचंड डेटा ठरणार उपयुक्त' - मुकेश अंबानी

'कृत्रिम बुद्धिमत्तेत भारत करणार जगाचं नेतृत्व; आपल्याकडचा प्रचंड डेटा ठरणार उपयुक्त' - मुकेश अंबानी

'AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा हा कच्चा माल आहे. भारताकडे असलेला प्रचंड डेटा हा मोठा स्रोत आहे. त्याचा सुयोग्य वापर करून आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये भरीव कामगिरी करता येईल', असं RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जागतिक परिषदेत सांगितलं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : यापुढच्या काळात AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणार आहे आणि हीच वेळ भारताने जगाचं या क्षेत्रात नेतृत्व करण्याची आहे, असं प्रतिपादन रिलायन्सचे (RIL ) चेअरमन मुकेश अंबानी यांनी RAISE 2020 परिषदेत केलं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) या विषयावर पहिली जागतिक परिषद भारत सरकारने आयोजित केली आहे. त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. Responsible AI for Social Empowerment 2020 किंवा RAISE 2020 या नावाची ही शिखर परिषद 5 ऑक्टोबरपासून पाच दिवस चालणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान मोदींनी भारत AI साठी ग्लोबल हब बनावा, अशी इच्छा व्यक्त केली. भारताने AI च्या क्षेत्रात भरीव कामगिरी करावी आणि आपला देश कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक केंद्र ठरावा (Global hub for AI) असं पंतप्रधान मोदी म्हणाले. रिलायन्सचे (RIL)चेअरमन मुकेश अंबानी यांनी या परिषदेत त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या जागतिक परिषदेत सहभागी होणं हे भाग्य असल्याचं त्यांनी प्रथम नमूद केलं. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचं हे प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. अंबानी म्हणाले, "AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा हा कच्चा माल आहे. भारताकडे असलेला प्रचंड डेटा हा मोठा स्रोत आहे. त्याचा सुयोग्य वापर करून आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये भरीव कामगिरी करता येईल." "सध्या भारताकडे उपलब्ध असलेली संसाधनं आणि संधी पाहता जगात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी आणि वर्ल्ड लीडर बनण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे.  AI ला चालना देण्यासाठी आणि नवा मजबूत भारत बनवण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी या देशाची युवा पिढी, इंडस्ट्री आणि अवघा देश तयार आहे", असंही अंबानी यांनी सांगितलं. या परिषदेत नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, IBM चे सीईओ अरविंद कृष्णा  हेसुद्धा सहभागी झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय  (Ministry of Electronics and Information Technology (MeitY) आणि नीती आयोग ( NITI Aayog) यांची मिळून या शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. MeitY चे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या परिषदेचा उद्देश सांगितला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शस्त्र म्हणून गैरसरकारी सूत्रांनी करता कामा नये, असा इशाराही मोदींनी दिला. या परिषदेत IBM चे CEO अरविंद कृष्णा यांनीही भाग घेतला. आयबीएम सध्या कर्नाटक सरकारबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. "आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेतली तर वर्गात मुलं आणि शिक्षकांचं योग्य प्रमाण राखता येईल. सध्या भारतात एका शिक्षकाकडे अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. AI च्या क्षेत्रात लवकरच भारत क्रांती करेल", असं अरविंद कृष्णा म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Mukesh ambani

    पुढील बातम्या