तिच्या हट्टापायी ब्रेन सर्जरीवेळी केलं फेसबुक LIVE , पाहा VIDEO

तिच्या हट्टापायी ब्रेन सर्जरीवेळी केलं फेसबुक LIVE , पाहा VIDEO

मेंदुची शस्त्रक्रिया सुरू असताना ती लाइव्ह दाखवण्याची अजब मागणी तिने केली. यामागे तिच्या मनात असलेली भिती कारणीभूत होती.

  • Share this:

टेक्सास, 01 ऑक्टोबर : अमेरिकेतील मेथॉडिस्ट डल्लास मेडिकल सेंटरने त्यांच्या एका रुग्णाच्या हट्टापायी मेंदुच्या शस्त्रक्रियेचा फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ केला. टेक्सासमध्ये राहणाऱ्या जेन्ना स्कार्ड्टच्या डोक्याच्या एका भागात रक्त साचलं होतं. त्यामुळे जेन्नाला बोलण्याचा त्रास होत होता. यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही सर्जरी जेन्नाच्या फेसबुकवरून लाइव्ह दाखवण्यात आली. जेन्नाला भिती होती की तिची बोलण्याची क्षमता गमावणार तर नाही ना. यासाठी शस्त्रक्रियेवेळी तिला सतत बोलत रहायचं होतं.

शस्त्रक्रिया सुरु असताना सुरुवातीचा काही वेळ जेन्नाच्या हट्टापायी डॉक्टरांनी फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी जेन्ना डॉक्टरांसोबत सतत बोलत होती. 25 वर्षीय जेन्ना पडद्याच्या दुसऱ्या बाजूला होती. या लाइव्हमध्ये डॉक्टर शस्त्रक्रिया करताना दिसत आहेत.

मेथोडिस्ट डल्लास मेडिकल सेंटरच्या न्यूरॉलॉजीचे प्रमुख भारतीय वंशाचे डॉक्टर निमेश पटेल आहेत. पटेल यांनी सांगितलं की जेन्ना स्कार्ड्टच्या डोक्यात रक्ताच्या गाठींमुळे बोलण्यात अडचणी येतात. जेन्ना शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांशी बोलत होती. तिला भिती वाटत होती की बोलण्याची क्षमता जाईल. अशा अवस्थेत बोलत राहण्याने शस्त्रक्रियेवर लक्ष ठेवणं सोपं झालं.

जेन्ना स्कार्ड्ट ऑक्यूपेशनल थेरपीची विद्यार्थीनी आहे. शस्रक्रियेचा अनुभव तिला लोकांपर्यंत पोहचवायचा होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिच्या या धाडसाचं कौतुक करताना मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांचही अभिनंदन केलं जात आहे.

वाचा : Whatsapp वरून सरकारने केली हेरगिरी, देशात खळबळ!

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 1, 2019, 1:47 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading