आधार-पॅन लिंकिंगची मुदत पुन्हा वाढवली, या तारखेच्या आधी करा लिंक

आधार-पॅन लिंकिंगची मुदत पुन्हा वाढवली, या तारखेच्या आधी करा लिंक

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं आहे की नाही हे चेक करा. आधार - पॅन लिंक तुम्हीसुद्धा करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने 31 मार्च 2020 पर्यंत ही मुदत वाढवली आहे. ही मुदत 31 डिसेंबर 2019 ला संपणार होती. आतापर्यंत 8 वेळा आधार-पॅन लिंकिंगची मुदत वाढवली आहे.

इन्कम टॅक्स फाइल करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग गरजेचं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या आधार कार्ड योग्य असल्याचं म्हटलं होतं. तसेच सरकारकडून आधार पॅन लिंकिंगसाठी बंधनकारक करण्याच्या नियमाला परवानगी दिली होती. 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे.

आधार पॅन लिंकिंग कसं करायचं?

आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या. तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.

याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते. UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल

Nokia चा स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत, Amazon ची ऑफर

Published by: Suraj Yadav
First published: December 31, 2019, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading