Honor 10 Lite आहे 10000 मध्ये मिळणारा सर्वोत्तम फोन पुरस्काराचा मानकरी, जाणून घ्या यशाचे रहस्य

Honor 10 Lite आहे 10000 मध्ये मिळणारा सर्वोत्तम फोन पुरस्काराचा मानकरी,  जाणून घ्या यशाचे रहस्य

Honor 10 Lite मध्ये तुम्हाला मिळणार आहे 15.77 सेमी (6.21 इंच) स्क्रीन साईझ आणि 1080 x 2340 पिक्सेलच्या FHD+ स्क्रीन रिझोल्यूशनसह ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले.

  • Share this:

प्रिय स्मार्टफोन यूजर, तुम्हाला 10000 मध्ये एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सादर आहे, Honor 10 Lite, सध्या भारतात या फोनला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे कारण या स्मार्टफोनमध्ये आहे सुंदर लुक्स, ग्रॅडिएंट डिझाईन व त्याचा युनिक कॅमेरा आणि बरं का याची किंमतही अगदी खिशाला परवडणारी आहे. या उत्सवाच्या काळात HONOR चे स्मार्टफोनचं अख्खं मार्केट खाणार. तुम्ही तुमच्या जुन्या फोनला कंटाळला आहात किंवा तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट म्हणून स्मार्टफोन द्यायचा आहे, तर Honor 10 Lite हा एक खूप चांगला पर्याय आहे. चला तर पाहुयात काय आहे या स्मार्टफोनची खासियत

कॅमेरा

या डिव्हाईसमध्ये फिट असलेला कॅमेरा या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हा कॅमेरा आहे वाईड f/1.8 अपार्चर लेन्स सह 13MP 2MP रेअर AI कॅमेरा जो सुसज्ज आहे एलईडी फ्लॅश आणि फेज डिटेक्शन ऑटोफोकसच्या सुविधेसह. 24MP AI सेल्फी कॅमेरा असून त्याच्या 4-इन-1 लाईटनिंग फ्यूजन आणि एक्स्पोजर कम्पनसेशन टेक्नोलॉजीमुळे दिवस तसेच रात्रीच्या लाईटनिंगमध्ये सेल्फीचा सुपर अनुभव घेता येतो. कॅमेराची ही वैशिष्ट्ये तर आहेतच मात्र लो-लाईट सेटिंग्समध्ये उत्तम क्वालिटीचे फोटो व 4128 x 3096 पिक्सेलचे व्हिडिओ युजरला घेता येऊ शकतात. फेस डिटेक्शन, टच टू फोकस व डिजिटल झूम सारख्या फीचरचा विचार करता एकंदरीत कॅमेराचा अनुभव समाधानकारक आहे.

अतिरिक्तपणे, यात असलेला AR मोड तुमच्या फोटोग्राफीमध्ये अधिक गंमत आणेल, कारण या मोडमुळे तुम्ही फोटो क्लिक करताना सहजपणे बॅकग्राऊंड बदलू शकता तसेच विविध इफेक्ट्सह फोटो व व्हिडिओ कॅप्चर करू शकता. HONOR ने नामकरण केलेल्या ‘AI ब्युटी’ फीचरमुळे तुम्ही तुमचे वय, लिंग आणि त्वचेच्या रंगानुसार ब्युटी इफेक्ट्स देऊ शकता, त्वचा गुळगुळीत करणे, त्वचेचा रंग समायोजित करणे, मुरुमांना हटविणे आणि डोळे चमकदार करणे यासारख्या फीचरमुळे एकदम आकर्षक तरीही नैसर्गिक रुप तुम्ही तयार करू शकता.

डिझाईन आणि डिस्प्ले

Honor 10 Lite मध्ये तुम्हाला मिळणार आहे 15.77 सेमी (6.21 इंच) स्क्रीन साईझ आणि 1080 x 2340 पिक्सेलच्या FHD स्क्रीन रिझोल्यूशनसह ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले. त्यामुळे डिस्प्ले हा खूप विस्तृत वाटतो आणि 91% स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ असलेल्या बेझेल-लेस डिझाईनला त्याचे सर्व श्रेय जाते. इतर ब्रँडमध्ये निळ्या रंगाचे लाईट फिल्टर येते तर HONOR स्मार्टफोनमध्ये TUV रेईनलँड सर्टिफाईड आय केअर मोड आहे. या स्मार्टफोनचा टच स्क्रीन मल्टी-टच फंकशनसह येतो. स्टायलिश ग्रॅडिएंट डिझाईनमध्ये असलेला फोनचा विलक्षण व असाधारण लुक ही त्याची जमेची बाजू आहे. हातात फोन घेतल्यानंतर त्याचा जो फील आहे, तो उत्तमच.

Honor 10 Lite स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, सफायर ब्लू, स्काय ब्लू या प्रकारात उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूची फिनिशिंग ग्लास प्रकारात असल्याने फोनचा लूक स्लीक आणि उबर स्टायलिश दिसतो.

कामगिरी

Honor 10 Lite मध्ये 4GB RAM सह नवीन अँड्रॉईड 9 (Pie) आणि EMUI 9.1 अपडेट असलेला किरिन 710 octa-core प्रोसेसर आहे जो तुम्हाला फोन अतिशय स्मूथपणे वापरण्यास मदत करतो तसेच सुधारित GPU 3.0 ग्राफिक्स प्रोसेसिंगमुळे गेम खेळताना येणारा अनुभव मस्तच आहे. तुम्हाला यात त्रास-मुक्त, संथपणा नसलेली, हाय फ्रेम रेटची तर नक्कीच अपेक्षा करू शकता. आम्ही अतिशय आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही PUBG, ASPHALT 9 आणि FORTNITE सारखे हेवी ग्राफिक्स गेम्स या स्मार्टफोनवर प्ले करून पाहिले आहेत आणि ते उत्तमरित्या प्ले सुद्धा झाले आहेत.

Honor 10 Lite मध्ये असलेले नवीन EMUI 9.1 अपडेट एक अतिशय मजेशीर फीचर घेऊन येत आहे ज्यामुळे युजरला सर्व इनकमिंग कॉलसाठी रिंगटोन म्हणून व्हिडिओ सेट करता येणार आहे आणि AI एनहान्स्ड कॉल्स, AI व्हिजन, AI सीन रेकगनिशन सारख्या एनहान्स्ड AI क्षमता मिळत असल्याचा दावा HONOR करीत आहे.

आकर्षक किंमत

चला तर आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात जो आहे, Honor 10 Lite स्मार्टफोनची किंमत. उत्सवाच्या काळात हा स्मार्टफोन ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर खालील प्रकारात उपलब्ध असेलः

332GB मॉडेलसाठी INR 7,999

464GB मॉडेलसाठी INR 8,999

664GB मॉडेलसाठी INR 9,999

म्हणजे तसे पाहिले तर तुमच्या खिशाला परवडणारा हा स्मार्टफोन आहे.

तर मग अंतिम मत काय आहे?

असे दिसून येत आहे, हा स्मार्टफोन बजेट स्मार्टफोन प्रकारातील आहे. या स्मार्टफोनची किंमत पाहता मार्केटमध्ये आताच्या घडीला Honor 10 Lite खरेदी करण्यासच प्रथम प्राधान्य दिले जाईल. या फोनचा लुक छान आहे व मिळणारा अनुभवही आनंददायी आहे. सध्याच्या परिस्थितीत खरेदी करण्यास हाच सर्वोत्तम स्मार्टफोन आहे.  You can buy the phone on Flipkart

First published: September 26, 2019, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading