अरेच्चा इतका स्वस्त Apple चा iPhone? भारतातचं निर्मिती सुरू झाल्याने चाहते आनंदात

अरेच्चा इतका स्वस्त Apple चा iPhone? भारतातचं निर्मिती सुरू झाल्याने चाहते आनंदात

Apple iPhone ची किंमत कमी झाल्याने आता अनेकांच्या खिशाला हा फोन परवडू शकतो

  • Share this:

नवी दिल्ली, 24 : Apple ने भारतात आपल्या स्वस्त आणि सेकंड जनरेशन iPhone SE (2020) ची असेंब्लिंग सुरू केली आहे. यामुळे अनेक आयफोन प्रेमींचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याअंतर्गत अॅपलच्या आयफोनची किंमती कमी होणार असल्याने अनेकांच्या खिशाला ती परवडू शकेल.

कंपनीने सांगितले की फार लवकरच ऑथराइज्ड रिटेल स्टोअर आणि ऑनलाइन चॅनलवर विक्री करण्यासाठी हे आयफोन उपलब्ध होतील. कंपनीने या फोनला मिड-रेंज ऐंड्रॉईड यूजर्संना लक्षात ठेवून भारतात लॉन्च केलं आहे. आयफोन 8 प्रमाणे दिसणाऱ्या या फोनमध्ये आयफोन 11 चे फिचर्स पाहायला मिळतील. कंपनीने भारतात आयफोन SE 2020 ची किंमत 42,500 रुपये ठेवली आहे.

बंगळुरू फॅसिलीटीमध्ये सुरू आहे प्रॉडक्शन

नवीन आयफोन SE ला अॅपल सप्लायर विस्ट्रॉन आपल्या बंगळुरु फॅसिलिचीमध्ये मॅन्यूकॅक्चर करीत आहे. यासोबत अॅपल गेल्या आठवड्यात दोन ट्रिलियन डॉलर पार करणारी पहिली कंपनी झाली आहे. याशिवाय आता ते भारतात आपल्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या चार आयफोन्स- iPhone 11, iPhone XR, iPhone 7 आणि iPhone SE ला असेंबल करीत आहे.

हे वाचा-Microsoft चा मोठा निर्णय; या दोन सेवा करणार बंद

ऑफरमध्ये घेतल्यास 3600 रुपयांची सवलत

IDC इंडियाचे रिसर्च डायरेक्टर नवकेंदर सिंह यांनी सांगितले की आयफोन SE ला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि यामागील मुख्य कारण याच्या किमती आहेत. HDFC बँकेच्या कॅशबॅक ऑफरसह आयफोन SE ची किंमत कमी करीत 38,900 रुपये इतकी झाली आहे. तर सीएमआरचे हेड (IIG) प्रभु राम यांचं म्हणणं आहे की, अॅपलने आयफोन SE 2020 च्यासह भारतात आपल्या प्रगतीत आणखी एक धडा जोडला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या