आम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर !

आम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर !

गेल्या काही दिवसांत मुलं चोरण्याच्या अफवेच्या मॅसेजमुळे देशभरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटलाय. मात्र, आम्ही अशा फेक बातम्या आणि अफवा रोखू शकत नाही असं स्पष्टीकरण व्हाॅट्सअॅपने केंद्र सरकारला दिलंय. हे थांबवायचं असेल तर भारत सरकारसोबत भागिदारी करावी लागेल असंही व्हाॅट्सअॅपने स्पष्ट केलं.

3 जुलैला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला व्हाॅट्सअॅपने एक पत्रक पाठवलंय. आम्ही वापरकर्त्यांच्या माहितीपासून लोकं कसे सुरक्षित राहतील याच्यासाठी प्रयत्न करतोय ग्रुपमधील चॅटसाठी नव्या उपाययोजना करत आहोत जेणे करून फेक बातम्या पसरवण्यापासून थांबवता येईल.

फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हाॅटस्अॅपचं नवीन फिचर

नवीन लेबल टेस्ट

व्हाॅट्सअॅप भारतात गेल्या दिवसांपासून जनजागृतीसाठी सुरक्षीत अभियान राबवत आहे. यासाठी नवीन लेबल टेस्ट करत आहे. हे लेबल कुणी कुठे काय फाॅरवर्ड केले हे दिसून येईल. त्यामुळे जर कुणी जुना मॅसेज पाठवला असेल तर वापरकर्त्याला याची माहिती कळेल. एवढंच नाहीतर हा मॅसेज किती लोकांनी वाचला हे सुद्धा समजून येईल. लवकरच हे नवी फिचर लाँच होणार आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका!

अफवेचे 30 बळी

महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

गेल्या काही दिवसांत मुलं चोरण्याच्या अफवेच्या मॅसेजमुळे देशभरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात. यात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय. या अफवेमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  भारतात 20 कोटी व्हाॅट्सअॅप वापरकर्ते आहे. अशातच फेक मॅसेज आणि व्हिडिओने डेटा प्रायव्हसीमुळे फेसबुकची डोकेदुखी वाढली आहे.

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

फेक न्यूज रोखण्यासाठी व्हाॅट्सअॅपची नवीन रणनीती

होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव!

आम्ही नेहमी लोकांना आॅनलाईन सेफ राहण्यासाठी सल्ला देतोय. आम्ही लोकांना फेक न्यूज कशा ओळखायच्या याबद्दल सांगतोय. यासाठी लवकरच माहिती देणारे बुकलेट पाठवले जाईल. यावेळी आम्ही पहिल्यांदाच फॅक्ट चेकिंग संस्थेसोबत काम सुरू केले आहे. जेणे करून अफवा आणि फेक न्यूज रोखण्यात येऊ शकतात असं व्हाॅट्सअॅपने सांगितलंय.

First published: July 4, 2018, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading