मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple चा सर्वात मोठा इव्हेंट; iPhone 14 आज होणार लाँच, पाहा संपूर्ण डिटेल्स

Apple चा सर्वात मोठा इव्हेंट; iPhone 14 आज होणार लाँच, पाहा संपूर्ण डिटेल्स

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

अ‍ॅपल इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. हा इव्हेंट तुम्ही Apple TV, अधिकृत Youtube चॅनेल आणि Apple वेबसाइटवर थेट ऑनलाइन पाहू शकता. या इव्हेंटमध्ये iPhone, Watch आणि AirPods लाँच केले जातील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 7 सप्टेंबर: अ‍ॅपल (Apple) च्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर आज 7 सप्टेंबर रोजी संपणार आहे. आतापासून काही तासांमध्‍ये अ‍ॅपलने क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये मोठा इव्‍हेंट आयोजित केला आहे. आजच्या या कार्यक्रमात कंपनी नवीन iPhones, नवीन Apple Watches आणि Airpods Pro 2 सह अनेक उत्पादनांबाबत मोठ्या घोषणा करू शकते.

Apple 'Far Out' इव्हेंट कसा आणि कुठे पाहायचा?

अ‍ॅपलने कंपनीच्या क्यूपर्टिनो कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये खास कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. तुम्ही Apple TV, अधिकृत Youtube चॅनेल आणि Apple वेबसाइटवर इव्हेंट थेट ऑनलाइन पाहू शकता. नवीन iPhone 14 आज Apple 'Far Out' इव्हेंटमध्ये लाँच केली जाईल.

आयफोन 14 सीरिज डिटेल्स:

अ‍ॅपल आजच्या कार्यक्रमात iPhone 14 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल यावेळी 'आयफोन मिनी' लाँच करणार नाही. त्याऐवजी, 6.7-इंचाचा डिस्प्ले असलेला मोठा आयफोन ऑफर केला जाईल, ज्याला ‘iPhone 14 Plus’ असं नाव असेल. याचं नाव ‘iPhone 14 Max’ असण्याची अफवा होती. अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजला चार मॉडेलमध्ये लॉन्च करेल:

  1. 6.1-इंच डिस्प्लेसह iPhone 14
  2. 6.7-इंच डिस्प्लेसह iPhone 14 Plus
  3. 6.1-इंच डिस्प्लेसह iPhone 14 Pro
  4. 6.7 इंच डिस्प्लेसह iPhone 14 Pro Max

Apple iPhone 14 ची भारतात अंदाजे किंमत 79,990 रुपये आहे आणि iPhone 14 Max ची किंमत 90,000 रुपये आहे. iPhone 14 Pro ची किंमत 87,838 रुपये आणि iPhone 14 Pro Max ची किंमत 95,830 रुपये असेल.

हेही वाचा- Phone Hack: फोन बंद असला तरी होणार रेकॉर्डिंग, वापरा ही ट्रिक

अ‍ॅपल वॉच सीरीज 8:

Apple Watch Series 8 कमीत कमी बदलांसह Apple Watch Series 7 प्रमाणे दिसण्याचा अंदाज आहे. ऍपल वॉचमध्ये 41-45mm आकाराचे पर्याय आणि वेगवान कामगिरीसाठी S8 चिप असेल. वॉच 8 सीरिजमध्ये रग्ड प्रो व्हेरिएंट असण्याची अपेक्षा आहे, जी हायकर्स आणि बाइकर्स यांसारख्या क्रीडाप्रेमींसाठी असेल.

AirPods Pro 2 ची संभाव्य वैशिष्ट्ये:

Appleचे नवीन वायरलेस इअरबड्स उत्तम डिझाइन आणि सुधारित नॉईज कॅन्सलिंग तंत्रज्ञानासह येतील. अॅपलच्या या उपकरणात नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर H1 बसवण्यात येणार आहे. AirPods Pro 2 चांगल्या आवाजाच्या गुणवत्तेसाठी Apple च्या लॉसलेस ऑडिओ कोडेक (ALAC) किंवा ब्लूटूथचा (ब्लूटूथ 5.2) सपोर्ट असेल. नवीन वायरलेस नेक्स्ट जनरेशन इयरबड्समध्ये इन-इअर विंग टीप डिझाईन असण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे इअरबड्स कुठेतरी ठेवायला विसरलात तर ते शोधणं सोपं जाईल. जेव्हा तुम्ही Apple च्या Find My app द्वारे शोधता, तेव्हा या नवीन AirPods सोबत येणारा चार्जिंग केस आवाजामुळं ते कुठं आहे हे सहजपणे शोधता येईल.

First published:

Tags: Apple, Iphone