मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple कडून कित्येक वर्षांपूर्वीच प्रकरण निकाली, या iPhone युजर्सला मिळणार पैसे; वाचा नेमकं काय झालं

Apple कडून कित्येक वर्षांपूर्वीच प्रकरण निकाली, या iPhone युजर्सला मिळणार पैसे; वाचा नेमकं काय झालं

नुकतंच Apple ने एक कित्येक वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली काढलं आहे. याअंतर्गत काही खास iPhone Users ला पैसे देण्यात आले आहेत.

नुकतंच Apple ने एक कित्येक वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली काढलं आहे. याअंतर्गत काही खास iPhone Users ला पैसे देण्यात आले आहेत.

नुकतंच Apple ने एक कित्येक वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली काढलं आहे. याअंतर्गत काही खास iPhone Users ला पैसे देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 8 मे : Apple एक असा स्मार्टफोन ब्रँड आहे, ज्याची सर्वांनाच ओळख आहे. नुकतंच Apple ने एक कित्येक वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली काढलं आहे. याअंतर्गत काही खास iPhone Users ला पैसे देण्यात आले आहेत. 2015 चं हे प्रकरण आता सोडवण्यात आलं आहे.

काही वर्षांपूर्वी Apple विरोधात काही iPhone युजर्सनी एक खटला दाखल केला होता. 2015 मध्ये iPhone 4s डिव्हाइस iOS 9 चं अपडेट अतिशय स्लो झालं होतं. त्यामुळेच डिसेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या iPhone 4s युजर्सनी Apple विरोधात गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीत युजर्सने असा दावा केला, की त्यांनी iOS 9 अपडेट आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड केलं, त्यानंतर त्यांचा फोन अतिशय स्लो झाला. पण या अपडेटमध्ये, फोन अपडेट केल्यानंतर तो अतिशय फास्ट आणि रिस्पॉन्सिव्ह होईल असं सांगण्यात आलं होतं. Apple ने खोटी Ad अर्थात जाहिरात देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा दावा या युजर्सनी केला. त्यामुळेच त्यांना याची नुकसानभरपाई हवी असं त्यांनी म्हटलं होतं.

हे वाचा - Google Smartwatch खरेदी करण्याचा विचार करत आहात? हात जळल्याची युजरची तक्रार

हेच प्रकरण कंपनीने आता निकाली काढलं आहे. आता या समस्येमुळे त्रस्त असलेल्या iPhone 4s युजर्सला 15 डॉलर अर्थात जवळपास 1154 रुपये देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. MacRumours ने दिलेल्या माहितीनुसार, Apple ने या iPhone 4s युजर्ससाठी 20 मिलियन डॉलर्स वेगळे ठेवले होते. ज्या iPhone 4s युजर्सला त्यांना या समस्येमुळे त्रास झाला असं वाटत असेल, त्यांनी आपलं नाव, ईमेल आयडी आणि आपल्या iPhone 4s चा सीरियल नंबर द्यावा असं सांगण्यात आलं आहे. Apple ने एक वेगळी वेबसाइट तयार केली आहे, जिथे युजर्स आपला फॉर्म आणि आवश्यक माहिती भरून ही रक्कम क्लेम करू शकतील.

First published:

Tags: Apple, Iphone, Tech news